शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : जिल्हा परिषदेत सोमवारी, शुक्रवारी अधिकाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 11:59 IST

बाराही तालुक्यांतून येणाऱ्या अभ्यागतांच्या सोईसाठी सोमवार आणि शुक्रवारी अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेत थांबणे अनिवार्य असल्याचे परिपत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी काढले आहे. तसेच कर्मचाऱ्यांनीही कोणती शिस्त पाळली पाहिजे, याबाबत या परिपत्रकात सविस्तर सूचना करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हा परिषदेत सोमवारी, शुक्रवारी अधिकाऱ्यांची उपस्थिती अनिवार्यअभ्यागतांच्या सोईसाठी कर्मचाऱ्यांनाही सीईओंच्या सूचना

कोल्हापूर : बाराही तालुक्यांतून येणाऱ्या अभ्यागतांच्या सोईसाठी सोमवार आणि शुक्रवारी अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेत थांबणे अनिवार्य असल्याचे परिपत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी काढले आहे. तसेच कर्मचाऱ्यांनीही कोणती शिस्त पाळली पाहिजे, याबाबत या परिपत्रकात सविस्तर सूचना करण्यात आल्या आहेत.जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये या अनुषंगाने अनेक वेळा चर्चा झाली होती. या पार्श्वभूमीवर डॉ. खेमनार यांनी हे परिपत्रक काढले आहे. सोमवारी आणि शुक्रवारी सकाळी ११ ते १ व दुपारी ३ ते ५ ही वेळ निश्चित करून येणाऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे समाधान करणे आवश्यक असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.

महत्त्वाच्या बैठका, संपर्क दौरे असल्यास तशी अभ्यागतांना पूर्वकल्पना द्यावी, दूरध्वनी, ई-मेल यांचा वापर करून संबंधितांना त्यांच्या कामासाठी वारंवार जिल्हा परिषदेत यावे लागणार नाही, याची काळजी घ्यावी; दुपारच्या जेवणाची वेळ दुपारी दीड ते दोन अशी ठरली आहे. तिचे पालन व्हावे. कर्मचाऱ्यांनी वेळेवर हजर राहणे. आवश्यकतेनुसार गणवेश, ओळखपत्र धारण करावे. कार्यालयीन शिस्तीचे आणि स्वच्छतेचे पालन करावे, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.अधिकाऱ्यांनी फिरतीच्या ठिकाणी जातानाही कार्यालयाला स्पष्ट कल्पना द्यावी. तालुकास्तरावरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेतील तळमजल्यावरील माहिती कक्षातील नोंदवहीमध्ये कामाच्या स्वरूपाची नोंद करणे बंधनकारक आहे.

वाहनचालक व परिचर संवर्गातील कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत गणवेश परिधान करावा. जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनीही कार्यालयीन कामासाठी बाहेर जाताना हालचाल नोंदवहीमध्ये नोंद करावी, अशा सूचना या परिपत्रकाद्वारे केल्या आहेत.

जुन्या वस्तूंचे निर्लेखन कराकार्यालयीन दुरुस्ती, संगणक, स्टेशनरी खरेदी, जुन्या वस्तूंचे वेळेत निर्लेखन करण्याकडे विभागप्रमुखांनी नियमित लक्ष द्यावे. गरजेच्या वस्तूंचा वार्षिक आराखडा बनवून नियमाप्रमाणे आपल्या विभागाकडे / जिल्हा परिषदेकडे विहित मुदतीत याबाबतची मागणी करावी. आवश्यक वस्तूंचा तुटवडा भासून त्याचा विकासकामांवर विपरित परिणाम होऊ नये, याची दक्षता विभागप्रमुखांनी घ्यावी, अशीही सूचना देण्यात आली आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद