शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

Kolhapur: होमटाऊन वगळून सहाशे पोलिसांच्या दिवसात बदल्या शहरातील पोलिस ठाण्यांना प्राधान्य

By उद्धव गोडसे | Updated: May 29, 2023 22:51 IST

Kolhapur: जिल्हा पोलिस दलातील सुमारे ६०० पोलिसांच्या प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया सोमवारी (दि. २९) मुख्यालयातील अलंकार हॉलमध्ये पार पडली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा तालुका वगळून पोलिसांना बदलीचे ठिकाण देण्यात आले.

- उद्धव गोडसेकोल्हापूर : जिल्हा पोलिस दलातील सुमारे ६०० पोलिसांच्या प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया सोमवारी (दि. २९) मुख्यालयातील अलंकार हॉलमध्ये पार पडली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा तालुका वगळून पोलिसांना बदलीचे ठिकाण देण्यात आले. बहुतांश पोलिसांनी शहरातील पोलिस ठाण्यांना प्राधान्य दिले होते. मात्र, जागांची उपलब्धता लक्षात घेऊन बदल्या करण्यात आल्या. त्यामुळे अनेकांना पसंती क्रमावर पाणी सोडावे लागले.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे पोलिसांच्या प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया रखडली होती. एप्रिल महिन्यातच बदल्या होतील, असे तत्कालीन पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी जाहीर केले होते. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे बदल्यांची प्रक्रिया लांबली. अखेर नूतन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सोमवारी बदल्यांची प्रक्रिया पार पाडली. यासाठी अलंकार हॉलमध्ये व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी सातपासून प्रक्रियेला सुरुवात झाली. ग्रेड उपनिरीक्षक, सहायक फौजदार, पोलिस हवालदार, पोलिस नाईक आणि पोलिस शिपाई यांच्या बदल्यांची प्रक्रिया रात्री आठपर्यंत पार पडली. प्रत्येक कर्मचा-याचा पसंती क्रम आणि उपलब्ध जागा यांची पडताळणी करून बदलीचे ठिकाण देण्याचा प्रयत्न पोलिस अधीक्षकांनी केला. मोटार परिवहन विभागातील बदल्यांची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

आगामी निवडणुका लक्षात घेऊन पोलिसांना त्यांच्या मूळ तालुक्याबाहेरचे पोलिस ठाणे मिळावे, याची खबरदारी अधिका-यांनी घेतली. त्यासाठी काही पोलिसांना पसंती क्रमावर पाणी सोडावे लागले. मात्र, मागितलेल्या पोलिस ठाण्यापासून जवळचे पोलिस ठाणे देण्यास अधिका-यांनी प्राधान्य दिले. मुलांचे शिक्षण, राहण्याचे ठिकाण या सोयींमुळे अनेकांनी शहरातील पोलिस ठाण्यांना प्राधान्य दिले होते. या तुलनेत चंदगड, नेसरी, आजरा, गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी, गारगोटी या पोलिस ठाण्यांची मागणी कमी होती. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, उपअधीक्षक प्रिया पाटील, अजित टिके, समीरसिंह साळवे यांच्या उपस्थितीत बदल्यांची प्रक्रिया पार पडली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिस