शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मर्डर फिक्स २०२५, कोल्हापूरचा बाप; आक्षेपार्ह रिल्स, स्टेटसवरून शाहूपुरी पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 18:10 IST

रुबाब केला तिथेच उठाबशा काढल्या

कोल्हापूर : मर्डर फिक्स २०२५, कोल्हापूरचा बाप... अशा मजकुराचा आक्षेपार्ह स्टेटस ठेवणारे आणि रिल्स व्हायरल करणाऱ्या सहाजणांवर शाहूपुरी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. एरव्ही नागाळा पार्क येथील विवेकानंद कॉलेजबाहेर रुबाबात फिरणाऱ्या या टोळक्याला त्याच ठिकाणी उठाबशा काढायला लावून पोलिसांनी त्यांचा रुबाब उतरविला. ही कारवाई सोमवारी (दि. ३) दुपारी केली.विशाल ऊर्फ सर्किट अनिल साळुंखे (वय ३३, रा. महाराणा प्रताप चौक, कोल्हापूर), ओमकार दादा साबळे (२३, रा. भाजी मंडई, कसबा बावडा), रूपेश सुनील काशिद (२६, रा. कृष्णानंद कॉलनी, कसबा बावडा), भार्गव राहुल भोसले (२२, रा. रंकाळा टॉवर), वैभव विष्णू सूर्यवंशी (२९, रा. शाहू मिल चौक) आणि आर्यन दीपक मोरे (१९, रा. संकपाळ नगर, कसबा बावडा) अशी कारवाई केलेल्या तरुणांची नावे आहेत.विवेकानंद कॉलेजशी काही संबंध नसताना ते रोज या परिसरात रुबाबात वावरत होते. व्हॉट्सॲप, इन्स्टाच्या स्टेटसला आक्षेपार्ह मजकूर आणि रिल्स ठेवून ते दहशत माजवीत होते. मर्डर फिक्स २०२५ या रिल्समुळे ते पोलिसांच्या नजरेत आले.शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील आणि शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांनी सर्व संशयित तरुणांना पकडून नागाळा पार्क परिसरातून त्यांची वरात काढली. ज्या रस्त्यांवरून ते रुबाबात फिरत होते, तिथेच त्यांना उठा-बशा काढायला लावून त्यांचा रुबाब उतरविला. पोलिसांच्या कारवाईनंतर तरुणांनी पुन्हा आक्षेपार्ह रिल्स तयार करणार नाही आणि स्टेटसला ठेवणार नाही अशी कबुली दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Six Arrested for Objectionable Reels and 'Murder Fix 2025'.

Web Summary : Kolhapur police arrested six individuals for posting objectionable content, including a reel referencing 'Murder Fix 2025.' The group, known for loitering near Vivekananda College, was publicly reprimanded, doing squats as punishment for their actions. They pledged to stop.