शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

कोल्हापूर : पोलिसांनो, तणावापासून दूर रहा : विश्वास नांगरे-पाटील, पोलीस कल्याण सप्ताह समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 11:34 IST

पोलीस दलात काम करताना ताण-तणावापासून दूर राहिले पाहिजे. तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम आणि आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. कुटुंबीयांना शक्य तेवढा वेळ देऊन मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या, असे मार्गदर्शन विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना केले.  अलंकार हॉल येथे आयोजित केलेल्या पोलीस कल्याण सप्ताह समारोप समारंभात ते बोलत होते.

ठळक मुद्दे पोलिसांनो, तणावापासून दूर रहा : विश्वास नांगरे-पाटीलपोलीस कल्याण सप्ताह समारोप

कोल्हापूर : पोलीस दलात काम करताना ताण-तणावापासून दूर राहिले पाहिजे. तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम आणि आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. कुटुंबीयांना शक्य तेवढा वेळ देऊन मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या, असे मार्गदर्शन विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना केले.  अलंकार हॉल येथे आयोजित केलेल्या पोलीस कल्याण सप्ताह समारोप समारंभात ते बोलत होते.जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलीस कल्याण निधीच्या विविध योजनांची माहिती व्हावी, यासाठी गेल्या चार दिवसांपासून मुख्यालयातील अलंकार हॉल येथे पोलीस कल्याण सप्ताहाचे आयोजन केले होते.सप्ताहामध्ये आरोग्य शिबिर, व्यसनमुक्ती व्याख्यान, डॉ. प्रांजली धामणे यांची ‘आहार’ या विषयावर कार्यशाळा, शेती व दुग्धव्यवसायाची आवड असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी व्याख्यान, आदी कार्यक्रम पार पडले. शुक्रवारी या सप्ताहाचा समारोप होता.

प्रमुख पाहुणे नांगरे-पाटील यांच्या हस्ते २०१७-१८ शैक्षणिक वर्षात गुणवंत विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप, दप्तर-पुस्तक अनुदान, शैक्षणिक अग्रीम, पदव्युतर पदवी अशा पाल्यांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये निखिल शिंदे, अमित व्हटकर, मेहवीन शेख, सिद्धेश परीट, प्रदीप पाटील, रूपाली गुरव, करुणा कांबळे, शुभंकर नलवडे, रवींद्र पाटील, रितूल नाकील, भक्ती पाटील, समीक्षा पुजारी, अनघा हजारे, जास्मीन गवंडी यांचा समावेश होता. तसेच विशेष पोषण आहार अनुदान, सुदृढ बालिका अनुदानप्राप्त सहा महिला पोलीस कर्मचाऱ्यांना अनुदानाचे वितरणही करण्यात आले.

पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी पोलिसांसाठी चार वर्षांतून दोन दिवसांची मोफत सहल असते, तिचा लाभ घ्यावा. शासकीय योजनांची अनेकांना माहिती नसते, ती जाणून घ्यावी, असे आवाहन केले. यावेळी गृह पोलीस उपअधीक्षक सतीश माने, शाहूवाडी विभागाचे उपअधीक्षक आर. आर. पाटील, शहर उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते, तानाजी सावंत, अशोक धुमाळ, संजय मोरे, दिलीप जाधव, अनिल गुजर, शहाजी निकम यांच्यासह कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

आदर्श पोलीस वसाहतींना बक्षीसजिल्ह्यातील पोलीस वसाहतींसाठी आदर्श पोलीस वसाहत स्पर्धांचे आयोजन केले होते. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक- नवीन पोलीस वसाहत, मुख्यालय, द्वितीय - कुरुंदवाड पोलीस ठाणे वसाहत, तृतीय - लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे वसाहत यांनी मिळविला. त्यांना अनुक्रमे पाच, तीन व दोन हजार रुपये बक्षीस विशेष पोलीस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.पोलीस ठाण्यांना पुस्तिकांचे वाटपजिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणी व विशेष शाखांना पोलीस कल्याण उपक्रमाच्या योजनांबाबतची माहिती असणाऱ्या तीन हजार पुस्तिका, ४०० भित्तीपत्रके, ४० डिजिटल बॅनर्स यांचे वाटप करण्यात आले.

 

 

टॅग्स :Vishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटीलkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस