शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर पोलिसांनी चोरीस गेलेले ५४ लाखांचे दागिने मूळ मालकांना केले परत, पोलिस-नागरिकांचा जन संवाद उपक्रम

By सचिन भोसले | Updated: March 25, 2023 17:33 IST

तब्बल १ किलो इतके सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले होते

कोल्हापूर: कोल्हापूरपोलिस दलाने चोरी, दरोडे, चेन स्नॅचिंग अशा गुन्ह्यांमध्ये आरोपींकडून हस्तगत केलेले ५४ लाख ४५ हजार किमतीचे एक किलो सोन्याचे दागिने मूळ मालकांनी परत केले. आज, शनिवारी पोलिस मुख्यालयातील अलंकार हॉल येथे झालेल्या पोलिस - नागरिकांच्या जनसंवाद उपक्रमात विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते हे दागिने मूळ मालकांना परत करण्यात आले.चोरी, दरोडा, चेन स्नॅचिंग अशा विविध गुन्हयात चोरांनी लांबवलेले सोन्याचे दागिने कोल्हापूर पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी आणि तपासांतर्गत जप्त केले. चोर, दरोडेखोर यांना गजाआड करीत त्यांच्याकडून तब्बल १ किलो इतके सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले होते. हे दागिने मुळ मालकांना शनिवारी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी व पोलीस जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते समारंभपूर्वक परत करण्यात आले.यावेळी देवीचंद राठोड (कोल्हापूर) यांनी दहा किलो वजनाचा हरवलेल्या चांदीचा पास्ता मालकांना परत केला. सुप्रिया मुकुंद देशपांडे (रा.लक्ष्मीपुरी) यांनी बेवारस मयतावर अंत्यसंस्कार करण्यास पोलिसांना सतत मदत केली. अभिनंदन रामचंद्र मदभावी (रा .गणेशवाडी.ता. शिरोळ) यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांची जनावरे चोरणाऱ्या चोरट्याने पकडून दिले. यासह कोल्हापूर पोलीस दलातील एकूण बारा पोलीस अधिकारी कर्मचारी अंमलदार यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांचे प्राण वाचून पोलीस दलाचा लौकिक वाढविल्याबद्दल त्यांना प्रशासित प्रशंसापत्र देऊन गौरवण्यात आले. यामध्ये पोलीस निरीक्षक राहुल वाघमारे (मुरगुड ) अंमलदार टी. आय .सावंत, एस. आर. हेगडे (लक्ष्मीपुरी), महिला पोलीस अंमलदार जे.एन.चौगुले (पोलीस नियंत्रण कक्ष), रमेश शेंडगे (मुरगुड), डी.डी. देवमारी , ए. आर. डूंनुंग(शिवाजीनगर), पी.एन .हंकारे, एस वी.खाडे, एन. ए. केरीपाळे (कुरुंदवाड), के.जी बेंडगे, ए .आर. पाटील (जुना राजवाडा पोलीस ठाणे) यांचा समावेश आहे. याप्रसंगी पोलीस अपर अधीक्षक जयश्री देसाई, पोलीस उपाधीक्षक (गृह)प्रिया पाटील, शहर पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण, आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस