शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  डांबून ठेवून मैत्रिणीशी असभ्य वर्तन, साईराज जाधवसह चौघांना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 12:44 IST

राजारामपुरीतील मैत्रिणीच्या खोलीत घुसून तिच्याशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी ‘एसटी’ गँगच्या सराईत गुंड साईराज जाधव याच्यासह चौघांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, १४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

ठळक मुद्देडांबून ठेवून मैत्रिणीशी असभ्य वर्तनसाईराज जाधवसह चौघांना पोलीस कोठडी

कोल्हापूर : राजारामपुरीतील मैत्रिणीच्या खोलीत घुसून तिच्याशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी ‘एसटी’ गँगच्या सराईत गुंड साईराज जाधव याच्यासह चौघांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, १४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.संशयित साईराज दीपक जाधव (वय २९, रा. राजारामपुरी ११ वी गल्ली), मयूर मल्लिकार्जुन पाटील (२८, रा. मोरेवाडी, ता. करवीर), पंकज रमेश पोवार (२६, रा. माउली पुतळा, राजारामपुरी परिसर), अजिंक्य प्रशांत मगर (२६, रा. राजारामपुरी सहावी गल्ली) अशी त्यांची नावे आहेत. संशयित अभिजित सावंत याच्यासह आणखी दोन साथीदार फरार आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.अधिक माहिती अशी, शुक्रवारी गटारी अमावस्येच्या रात्री साईराज जाधव व त्याच्या साथीदारांनी पार्टी केली होती. त्या पार्टीस त्यांनी आपल्या मैत्रिणींना निमंत्रित केले होते. पार्टी झाल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास साईराज व त्याचे साथीदार पीडित मैत्रीण राहत असलेल्या खोलीमध्ये घुसले. मैत्रीणही नशेत होती. त्याचा गैरफायदा घेत त्यांनी तिच्याशी असभ्य वर्तन केले.

मारहाण करून तिच्याजवळचे साडेचार हजार रुपये काढून घेतले. आपल्याच मित्रांनी आपल्याशी जबरदस्तीने गैरवर्तन केल्याने तिने त्यांच्याशी वाद घातला. पोलिसांत तक्रार देण्याची धमकी देताच तिला रात्रभर तिच्याच खोलीत डांबून ठेवले. त्यानंतर सकाळी तिची सुटका झाली. याप्रकरणी पीडित युवतीने राजारामपुरीत पोलिसांत सात जणांच्या विरोधात तक्रार दिली.पीडित युवतीचा ग्रुप आहे. ती राजारामपुरी परिसरात भाड्याने खोली घेऊन राहते. तिला दारू, गांजाचे व्यसन आहे. या सराईत गुन्हेगारांशी तिचे उठणे-बसणे असायचे. त्यातूनच हा प्रकार घडला असून संशयित एसटी गँगचे प्रमुख सदस्य आहेत.

साईराज जाधव याच्यावर यापूर्वी मोका कारवाई केली; परंतु न्यायालयात अपील करून तो बाहेर पडला होता. त्याचे उपद्व्याप वाढत आहेत. त्याच्यावर पुन्हा मोका कारवाई करण्यासाठी प्रस्ताव पाठविणार असल्याचे राजारामपुरी पोलिसांनी सांगितले. 

 

टॅग्स :crimeगुन्हेkolhapurकोल्हापूर