शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: रिल्समधून धरला नेम ; 'आण्णा चेंबुरी'चा झाला गेम

By उद्धव गोडसे | Updated: February 8, 2024 11:36 IST

वाढदिवसालाच गजाआड, दौलतनगरातील प्रसाद कलकुटकी अटकेत, गावठी कट्टा जप्त

कोल्हापूर : बेकायदेशीर शस्त्र बाळगत इन्स्टाग्रामवरून फोटो, व्हिडिओ व्हायरल करून दहशत माजवणारा फाळकूटदादा आण्णा चेंबुरी याला पोलिसांनी बुधवारी (दि. ७) राजारामपुरीतील चुनेकर शाळेजवळून अटक केली. प्रसाद राजाराम कलकुटकी (वय २१, रा. तीन बत्ती चौक, दौलतनगर, कोल्हापूर) असे अटकेतील आण्णा चेंबुरीचे मूळ नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून गावठी कट्टा जप्त केला. चेंबुरी याच्या वाढदिवसालाच शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांच्या पथकाने ही कारवाई केली.फाळकूट दादांकडून बेकायदेशीर पिस्तूल, बंदूक, तलवार अशा शस्त्रांचा वापर करून परिसरात दहशत माजवली जाते. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केले जातात. विरोधी टोळ्यांना चिथावणी दिली जाते. यातून गुन्हेगारी वाढत असल्याने अशा प्रकारचे रिल्स बनवून दहशत माजवणाऱ्यांवर कारवाया करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिले आहेत. त्यानुसार शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांच्या पथकाकडून संशयित फाळकूट दादांच्या सोशल मीडिया खात्यांची तपासणी सुरू केली. यावेळी दौलतनगर येथील प्रसाद कलकुटकी ऊर्फ आण्णा चेंबुरी याचे पिस्तूलसह रिल्स व्हायरल झाल्याचे निदर्शनास आले.पोलिसांनी तातडीने त्याचा शोध सुरू केला असता, राजारामपुरी येथील चुनेकर शाळेजवळ तो असल्याचे समजले. पोलिस उपनिरीक्षक अभिजीत इंगळे यांच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केले. तसेच त्याच्या कमरेला असलेले गावठी पिस्तूल जप्त केले. पुढील तपासासाठी त्याचा ताबा राजारामपुरी पोलिसांकडे देण्यात आला. उपनिरीक्षक इंगळे यांच्यासह अंमलदार रमजान इनामदार, गौरव चौगुले, रोहित चौगुले, सुरेश देसाई यांच्या पथकाने ही कारवाई केली.

वाढदिवसाला पोलिसांचे 'गिफ्ट'आण्णा चेंबुरी याचा बुधवारी वाढदिवस होता. वाढदिवस झोकात साजरा करण्याची तयारी त्याने आणि त्याच्या मित्रांनी केली होती. पण, व्हायरल झालेल्या रिल्सने त्याच्या नियोजनावर पाणी पडले आणि पोलिसांनी त्याला थेट कोठडीचे गिफ्ट दिले.

पाच हजार रुपयात आणले पिस्तूलरिल्स तयार करण्यासाठी एका मित्राकडून पाच हजार रुपयांना पिस्तूल आणल्याची कबुली चेंबुरी याने पोलिसांना दिली. लाकडी मूठ असलेले गावठी बनावटीचे पिस्तूल वापरात नसून, ते केवळ फोटो आणि व्हिडिओसाठी वापरल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पिस्तूल विकणाऱ्या संशयिताचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस