शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नॅशनल गेम्स जलतरणात कोल्हापूरचा टक्का वाढला, वीरधवलने मोडला स्वत:चाच विक्रम 

By सचिन भोसले | Updated: November 9, 2023 15:27 IST

कोल्हापूर : राष्ट्रीय असो वा आंतरराष्ट्रीयस्तरावर कुस्ती, फुटबाॅल, नेमबाजी आणि जलतरण यासह अन्य खेळांतही कोल्हापूरकर खेळाडूंचा सहभाग वाढू लागला ...

कोल्हापूर : राष्ट्रीय असो वा आंतरराष्ट्रीयस्तरावर कुस्ती, फुटबाॅल, नेमबाजी आणि जलतरण यासह अन्य खेळांतही कोल्हापूरकर खेळाडूंचा सहभाग वाढू लागला आहे. नुकत्याच गोव्यात झालेल्या नॅशनल गेम्सअंतर्गत जलतरण स्पर्धेत कोल्हापूरचा ऑलंपियन वीरधवल खाडे याने वैयक्तीक ५० मीटर फ्रीस्टाईलमध्ये स्वत:चाच एक विक्रम मोडला. तर पत्नी ऋजुतासह तीन सुवर्ण आणि एक कांस्यपदकाची कमाई केली.पणजीतील कंपाल येथे झालेल्या या स्पर्धेत वीरधवलने २०१५ साली येथे झालेल्या नॅशनल स्पर्धेत २४.७३ इतकी वेळ नोंदवित ५० मीटर फ्रीस्टाईलमध्ये विक्रम नोंदविला होता. हा विक्रम त्याने या स्पर्धेत २०२३ साली पुन्हा २४.६० इतकी वेळ नोंदवित आपलाच विक्रम मोडीत काढला. त्याने या स्पर्धेत ५० मीटर फ्रीस्टाईल व बटरफ्लायमध्ये प्रत्येकी एक सुवर्ण, तर पत्नी ऋतुजा हिने ५० मीटर फ्रीस्टाईलमध्ये एक सुवर्ण व बटरफ्लायमध्ये एक कांस्य पदक पटकाविले. यासोबतच कोल्हापूरच्याच पूजा कुमरे-आळतेकर हिने महाराष्टाच्या वाॅटरपोलो संघातून प्रतिनिधीत्व करीत कांस्य पदक मिळवून देण्यात बाजी मारली.एकूणच राज्य जलतरण संघाने या स्पर्धेत जलतरण डायविंग व वाॅटरपोलो मध्ये ७ सुवर्ण, १० रौप्य आणि ६ कांस्य अशी एकूण २३ पदकांची कमाई केली. या संघासाठी कोल्हापूरचेच व राज्य जलतरण संघटनेचे अध्यक्ष आनंद माने व सचिव आणि राष्ट्रीय जलतरण संघटनेचे निमंत्रक राजेंद्र पालकर, प्रशिक्षक अरुणकुमार मिश्रा, विलास देशमुख, बालाजी केंद्रे, कैलाश आखाडे, नीळकंठ आखाडे यांचे मार्गदर्शन व राज्य जलतरण संघाचे व्यवस्थापक अजय पाठक यांनी विशेष परिश्रम केले. विशेष म्हणजे जलतरणात कोल्हापूरकरांचे वर्चस्व वाढू लागले आहे.केवळ नॅशनल गेम्स मधून तो खेळणार नाहीवीरधवल खाडे याने २०१५ मध्ये नॅशनल गेम्स मध्ये सुवर्ण मिळवून पदार्पण केले होते. त्याने २०२३ मध्ये ५० मीटर फ्रीस्टाईलमध्ये आपलाच विक्रम मोडीत काढला आहे. या विक्रमानंतर त्याने या स्पर्धेत यापुढे न खेळण्याचे ठरविले आहे. तर तो अन्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धात खेळणार आहे. असे त्याने स्पष्ट केले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSwimmingपोहणे