शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  शाळा बंद ठेवून मोर्चात सहभागी व्हा, चार हजार शाळांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 19:03 IST

शिक्षण वाचवा नागरिक कृती समितीच्यावतीने शुक्रवारी (दि. २३) गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय अशा काढण्यात येणाऱ्या मोर्चात शाळा बंद ठेवून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करणारी सुमारे चार हजार पत्रे कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघातर्फे जिल्ह्यातील विविध शाळांना पाठविण्यात आली आहेत, अशी माहिती समितीचे समन्वयक गिरीष फोंडे यांनी दिली.

ठळक मुद्देशाळा बंद ठेवून मोर्चात सहभागी व्हा, चार हजार शाळांना पत्रशिक्षक बनणार स्वयंसेवक

कोल्हापूर : शिक्षण वाचवा नागरिक कृती समितीच्यावतीने शुक्रवारी (दि. २३) गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय अशा काढण्यात येणाऱ्या मोर्चात शाळा बंद ठेवून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करणारी सुमारे चार हजार पत्रे कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघातर्फे जिल्ह्यातील विविध शाळांना पाठविण्यात आली आहेत,अशी माहिती समितीचे समन्वयक गिरीष फोंडे यांनी दिली.राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करू नयेत, कॉर्पोरेट कंपन्यांना शाळा सुरू करण्यास परवानगी देऊ नये, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. गांधी मैदान येथून सकाळी दहा वाजता निघणाऱ्या मोर्चात शहरासह जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सहभागी होणार आहेत.

खरी कॉर्नर, मिरजकर तिकटी, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, जिल्हाधिकारी कार्यालय, असा मोर्चाचा मार्ग असणार आहे. गांधी मैदान येथे सकाळी विविध संघटनांचे पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत तर जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चाचे नेतृत्व करणारे ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील हे मार्गदर्शन करतील. शुक्रवारी (दि.२३) भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचा शहीद दिन आहे. त्यामुळे त्यांची वेशभूषा परिधान करून अनेक विद्यार्थी या मोर्चात सहभागी होणार आहेत.

शहरातील पाच संघटना होणार स्वयंसेवकमोर्चात पन्नास हजारांहून अधिक विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्थाचालक, नागरिक सहभागी होणार आहेत. इतक्या मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरणार आहेत. त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी शहरातील पाच शिक्षक संघटना स्वयंसेवकांची भूमिका बजाविणार आहेत. त्यामध्ये खासगी शिक्षक महासंघ, खासगी शिक्षक समिती, मनपा शिक्षक समिती, मनपा शिक्षक संघ, मनपा शिक्षक पुरोगामी संघटनेचा समावेश असेल, अशी माहिती संतोष आयरे यांनी दिली.

विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाहीशाळा बंद ठेवून शिक्षक मोर्चात सहभागी होणार आहेत. त्यामुळे जादा वेळ देऊन शुक्रवारी होणारे शैक्षणिक नुकसान शिक्षकांच्यावतीने भरून काढण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे या मोर्चामुळे नुकसान होणार नाही, असे शैक्षणिक व्यासपीठातर्फे सांगण्यात आले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरeducationशैक्षणिक