शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : युवती आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी पंढरीनाथ पाटील निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 18:40 IST

केर्ले (ता. करवीर) येथील महाविद्यालयीन युवतीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी संशयित प्रा. पंढरीनाथ पाटील याला गुरुवारी न्यायालयाने सोमवार (दि. ३०) पर्यंत पोलीस कोठडी दिली. प्रा. पाटील याच्यावर महाविद्यालयातून निलंबनाची कारवाई संबंधित शिक्षण संस्थेने केली आहे.

ठळक मुद्देयुवती आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी पंढरीनाथ पाटील निलंबितसोमवारपर्यंत पोलीस कोठडी

कोल्हापूर : केर्ले (ता. करवीर) येथील महाविद्यालयीन युवतीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी संशयित प्रा. पंढरीनाथ पाटील याला गुरुवारी न्यायालयाने सोमवार (दि. ३०) पर्यंत पोलीस कोठडी दिली. प्रा. पाटील याच्यावर महाविद्यालयातून निलंबनाची कारवाई संबंधित शिक्षण संस्थेने केली आहे. दरम्यान, संबंधित युवतीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याचा तपास करवीर पोलीस करीत आहेत.पोलिसांनी सांगितले की, दसरा चौक परिसरातील एका नामवंत महाविद्यालयात पंढरीनाथ पाटील हा प्राध्यापक आहे. याच महाविद्यालयात वाणिज्य विभागातील दुसऱ्या वर्गात संबंधित युवती शिक्षण घेते. संबंधित युवतीस या प्राध्यापकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केला.

ही युवती कळंबा तलाव येथे बुधवारी (दि. २५) गेली व तिने मोबाईलवरून पाटीलला फोन केला. यात दोघांत वाद झाला. या वादातून तिने विष प्राशन केले. हा प्रकार तिच्या नातेवाइकांना समजला. तिला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. संशयित पाटील याला करवीर पोलिसांनी अटक केली.

गुरुवारी पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी पंढरीनाथ पाटीलला न्यायालयात हजर केले. त्याला न्यायालयाने सोमवार (दि. ३०) पर्यंत पोलीस कोठडी दिली. याचा तपास पोलीस उपनिरीक्षक स्नेहा पाटील करीत आहेत.दरम्यान, या प्रकरणाची माहिती समजल्यानंतर गुरुवारी सकाळी संबंधित महाविद्यालय संलग्न असलेल्या शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीने तातडीची बैठक घेतली. त्यात प्रा. पाटील याला निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

याबाबतचे पत्र संस्थेने जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना दिले, अशी माहिती संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी दिली. पंढरीनाथ पाटील हा गेल्या सात वर्षांपासून महाविद्यालयात कनिष्ठ विभागात सेवा बजावत होता. सुरुवातीला शिक्षणसेवक म्हणून त्याने तीन वर्षे काम केले. त्यानंतर तो प्राध्यापक म्हणून सेवेत रुजू झाला. 

 

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर