शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

नेत्र‘दीपक’ पहाट: त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ५१ हजार दिव्यांनी झळाळली कोल्हापूरची पंचगंगा

By सचिन भोसले | Updated: November 27, 2023 13:56 IST

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सुमधूर संगीत, फटाक्यांची आतषबाजी; दीपोत्सवात ‘लेझर शो’चा अडथळा

कोल्हापूर : रम्य पहाट, बोचरी थंडी, सुमधूर संगीत, फटाक्यांची आतषबाजी अशा उत्साही वातावरणात पंचगंगा नदी घाटावर सोमवारी पहाटे दीपोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त पंचगंगा नदीघाट परिसरात शिवमुद्रा प्रतिष्ठानतर्फे सोमवारी पहाटे ५१ हजार दिवे प्रज्वलित करण्यात आले. या उपक्रमाला कोल्हापूरकरांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.पहाटे साडेतीन वाजता प्रतिष्ठानतर्फे संदीप देसाई यांच्या हस्ते आरती करून दीपोत्सवाला सुरूवात झाली. रात्री बारा वाजल्यापासून नागरिकांनी गर्दी करायला सुरूवात केली होती. येथे आलेल्या नागरिकांनीही एक दीप पंचगंगेसाठी लावला. आरतीनंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. विशेषत: तरुणाईचा उत्साह अधिक होता.

यंदाचे ४१ वे वर्ष आहे. दीपोत्सवाची तयारी रविवारी रात्रीपासूनच सुरू होती. लेसर शो आणि हजारो दिव्यांच्या प्रकाशात येथील मंदिरांचे सौंदर्यही आणखी खुलून दिसत होते. पहाटेच्यावेळी या मंदिरांचे देखणे रूप अनेकांना पाहता आले. या सोहळ्यासाठी विकी कवाळे, अविनाश साळोखे, दीपक देसाई, अर्जुन आंबी, अवधूत कोळी, प्रवीण चौगले, विनायक हजारे आदींनी परिश्रम घेतले.आकर्षक रांगोळ्या, भक्तीगीतांनी दीपोत्सवात रंगतआकर्षक रांगोळ्यांमध्ये बेटी बचाओ, सेव्ह द गर्ल्स, रोटरी-रोट्रॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूरतर्फे भ्रष्टाचाराला आळा घालूया, सुरूवात आपल्यापासून, अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती आदी रांगोळ्या पाहण्यासाठी गर्दी झाली होती. अनेकांनी याच्या छबी मोबाइलमध्ये उतरवल्या. तसेच महेश हिरेमठ प्रस्तुत अंतरंग वाद्यवृंदातर्फे दीपोत्सव पहाट म्हणून भावगीत, भक्तिगीते सादर करण्यात आली. भक्तीगीतांनी दीपोत्सवाची रंगतमंदिरे उजळलीयानिमित्त नदीघाटांसह ब्रह्मपुरी, महादेव मंदिर, कृमकेश्वर मंदिर, रावणेश्वर, पिकनिक पॉईंट, परिसरातील दीपमाळांवर नागरिकांनी पहाटे तीन वाजल्यापासून दिवे प्रज्वलित करण्यास सुरूवात केली. नदीपात्रात असलेल्या समाधी मंदिरावरही विविधरंगी लेझर किरणांचा प्रकाशझोत टाकण्यात आला होता. हा सोहळा नयनरम्य डोळ्याला सुखवणारा दिसत होता. या उत्सवाची सुरूवात दीपपूजनाने झाली. समाधी स्थळावरील महादेव मंदिरात श्री महाकालची पूजा विशेष लक्षवेधी ठरली.दीपोत्सवात ‘लेझर शो’चा अडथळा

यंदाच्या दीपोत्सवात ५१ हजार दिव्यांनी घाट नैसर्गिकरीत्या उजळला हे दृश्य सर्वांच्याच डोळ्यांना सुखावणारे होते. त्यात ‘लेझर शो’चा अतिवापर केल्यामुळे या दीपोत्सवाची मजा उडाल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती. याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली. यापुढे तरी केळ तेलाचे आणि मेणाच्या पणत्यांचे दिवे लावावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदी