शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

कोल्हापूर : अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामुहीक आत्मदहन करु : राजू जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 14:33 IST

शाहूपुरी पाच बंगला भाजी मंडईत विक्रेत्यांना त्रास देणाऱ्या विलास नायडू, लखन नायडू, मिरा सय्यद या तिघांचा येत्या आठ दिवसांत कायमस्वरुपी बंदोबस्त करावा. अन्यथा सर्व भाजीपाला विक्रेते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी (दि. १४) ला सामुहीक आत्मदहन करतील, असा इशारा विक्रेत्यांतर्फे राजू जाधव यांनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिला.

ठळक मुद्देअन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामुहीक आत्मदहन करु : राजू जाधव पाच बंगला भाजी विक्रेत्यांचा इशारा

कोल्हापूर : शाहूपुरी पाच बंगला भाजी मंडईत विक्रेत्यांना त्रास देणाऱ्या विलास नायडू, लखन नायडू, मिरा सय्यद या तिघांचा येत्या आठ दिवसांत कायमस्वरुपी बंदोबस्त करावा. अन्यथा सर्व भाजीपाला विक्रेते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी (दि. १४) ला सामुहीक आत्मदहन करतील, असा इशारा विक्रेत्यांतर्फे राजू जाधव यांनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिला.शाहूपुरी पाच बंगला भाजी मंडईमध्ये विलास नायडू याचा व अन्य विक्रेत्यांमध्ये वाद आहे. यातून नायडूने शाहूपुरी पोलीस ठाण्यासमोर रविवारी (दि. ४) रात्री विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या पार्श्वभूमीवर येथील भाजी विक्रेत्यांनी बुधवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती.जाधव म्हणाले, गेल्या काही वर्षापासून नायडूसह अन्य दोघेजण येथील भाजी विक्रेत्यांना वारंवार त्रास देत होते. यात माल काढून घेणे, हप्ता मागणे, अ‍ॅसिड मारण्याची धमकी देणे ,शिवीगाळ करणे , आदी पद्धतीने दहशत माजवत होते. यावर भाजी विके्रत्यांनी पोलीसांकडे दाद मागून त्यांचा बंदोबस्त केला होता. त्यानंतर आता पुन्हा त्याला भाजी मंडईत पुन्हा प्रवेश करायचा असल्याने तो भाजी विक्रेत्यांसह पोलीसांनाही आत्महत्येचा खोटा प्रयत्न करुन वेठीस धरत आहे.

त्यामुळे त्याच्यासह अन्य दोघांचाही पोलीसांनी व जिल्हा प्रशासनाने त्यांचा येत्या आठ दिवसांत कायमचा बंदोबस्त करावा. अन्यथा आम्ही सर्व भाजीपाला विक्रेते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी (दि. १४) ला सामुदायिक आत्मदहन करतील, असा इशाराही जाधव यांनी दिला.या पत्रकार परिषदेस बापू चव्हाण, आण्णा तिळवे, गणेश बुचडे, राजू बागवान, संतोष वाघमारे, किरण पोतदार, अजय चौगुले, किरण खाडे, मोहसीन बागवान, युवराज क्षीरसागर, समाधान बंगाली, जयाबाई शहा, टिपू शेख, संजय सोनवणे, सदाशिव जाधव, रंजना खाडे, योगेश कवाळे, प्रकाश तौर, सुखदेव मैत्री, पारुबाई शहा, लक्ष्मी सुतार, कविता चौगले, वंदना बुचडे, हसिना पसारकर, लक्ष्मी मंगाणे, मनीष क्षीरसागर, पोपट माळी, सुरेश कांबळे, प्रकाश पोवार, तानाजी खंडागळे, कैलास सुर्यवंशी, महेश शहा, श्रीमंत हिरवे, चंदु आलासे, नाजा कांबळे, रमा कांबळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMarketबाजार