शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : दूध दरवाढ न देणाऱ्यांवर कारवाई अन्यथा कार्यालयास टाळे, कॉँग्रेसचे सहायक निबंधकांना (दुग्ध) इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 16:24 IST

शासनाच्या आदेशाप्रमाणे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध दरवाढ न देणाऱ्या संघांवर कारवाई करा, अन्यथा कार्यालयास टाळे ठोकू. असा इशारा कॉँग्रेसच्या शिष्टमंडळाने सहायक निबंधकांना (दुग्ध) दिला.

ठळक मुद्देदूध दरवाढ न देणाऱ्यांवर कारवाई अन्यथा कार्यालयास टाळेकॉँग्रेसचे सहायक निबंधकांना (दुग्ध) इशारा

कोल्हापूर : शासनाच्या आदेशाप्रमाणे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध दरवाढ न देणाऱ्या संघांवर कारवाई करा, अन्यथा कार्यालयास टाळे ठोकू. असा इशारा कॉँग्रेसच्या शिष्टमंडळाने सहायक निबंधकांना (दुग्ध) दिला.दूध दर कपातीबाबत शुक्रवारी संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली कॉँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी सी. के. कांबळे यांना निवेदन देण्यात आले. दूध व्यवसाय अडचणीत आल्याने शासनाने प्रतिलिटर तीन रूपयांची दूध दरवाढ करण्याचे आदेश संघांना दिले. पण अतिरिक्त दूधाचे कारण पुढे करत जिल्हा दूध संघांने गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रूपयांची कपात केली.

गेले सहा महिन्यात उत्पादकांचे ३५ कोटीचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर दुग्ध विभागाने केवळ नोटीसा काढून खुलासा मागितला आहे. शासकीय आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या दूध संघावर थेट कारवाई करणे अपेक्षित होते.

कायद्याची अंमलबजावणी करणार नसाल तर केवळ संस्था नोंदणी करणे एवढेच काम या कार्यालयाचे आहे का? शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांवर योग्य कारवाई करणार नसाल तर दुग्ध कार्यालयास टाळे ठोकावे लागेल, असा इशारा संजय पाटील यांनी दिला. यावेळी करवीरचे सभापती प्रदीप झांबरे, जिल्हा परिषदेचे सदस्य बजरंग पाटील, बजरंग रणदिवे, योगेश हत्तलगे, तानाजी मोरे, संपत भोसले, उदय भोसले आदी उपस्थित होते.

मागण्या अशा :

  1. दूध दरवाढ आदेश डावल्याबद्दल दूध संघांवर फौजदारी दाखल करा.
  2. अतिरिक्त दूधाच्या नावाखाली खरेदी दरात कपात मग विक्री दर कमी का नाही.
  3. दूध संघावर प्रशासक नियुक्तीच्या नोटीसीचे काय झाले.

 

 

टॅग्स :congressकाँग्रेसkolhapurकोल्हापूर