शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : अकृषक कराला ‘कोल्हापूर चेंबर’चा विरोध, जिल्हाधिकारी कार्यालयावर १६ मार्चला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 11:24 IST

अकृषक कर आणि रूपांतरीत कराविरोधात कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीजने आंदोलन पुकारले आहे. हे कर रद्द करावेत या मागणीसाठी दि. १६ मार्चला सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

ठळक मुद्देअकृषक कराला ‘कोल्हापूर चेंबर’चा विरोधकोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर १६ मार्चला मोर्चाउद्योजक, व्यापारी, व्यावसायिक सहभागी होणार

कोल्हापूर : अकृषक कर आणि रूपांतरीत कराविरोधात कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीजने आंदोलन पुकारले आहे. हे कर रद्द करावेत या मागणीसाठी दि. १६ मार्चला सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये कोल्हापुरातील उद्योजक, व्यापारी आणि व्यावसायिक सहभागी होणार आहेत, अशी माहिती चेंबर आॅफ कॉमर्सचे उपाध्यक्ष संजय शेटे यांनी दिली.चेंबर आॅफ कॉमर्सच्या कार्यालयात गुरुवारी बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी ‘कोल्हापूर चेंबर’चे अध्यक्ष ललित गांधी होते. कोल्हापुरातील व्यापारी, उद्योजक आणि व्यावसायिकांना अकृषक कर आणि रूपांतरीत कर करण्यासाठी तहसीलदार कार्यालयामार्फत नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.

या नोटिसांमध्ये अनेकपटीने भरमसाठ कर लागू केला आहे. यापूर्वीसुद्धा या करास व्यापारी, उद्योजक आणि व्यावसायिकांना विरोध नोंदविला होता. या कराची महाराष्ट्रात इतरत्र कुठेही अंमलबजावणी होत नाही. हे कर अन्यायी, अवाजवी असल्याने त्याला विरोध दर्शविण्याचा ‘कोल्हापूर चेंबर’तर्फे आयोजित बैठकीत घेण्यात आला.

संबंधित कर रद्द करावेत, अशी मागणी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासह दि. १६ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी अकरा वाजता मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले, अशी माहिती उपाध्यक्ष संजय शेटे यांनी दिली. या बैठकीस आनंद माने, प्रदीपभाई कापडिया, शिवाजीराव पोवार, हरिभाई पटेल, धनंजय दुग्गे, नयन प्रसादे, राहुल नष्टे, वैभव सावर्डेकर, महेश धर्माधिकारी, अजित होनोले, रमेश कारवेकर, महेश सामंत आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorतहसीलदार