अकोला : शेतात विनापरवाना उभारला ‘हॉटमिक्स प्लांट’; चौकशी करण्याचे ‘एसडीओं’चे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 07:45 PM2018-01-06T19:45:06+5:302018-01-06T19:58:47+5:30

अकोला : बोरगाव मंजू शिवारात भाड्याने घेतलेल्या शेतात अकृषक परवानगी न घेता विनापरवाना उभारण्यात आलेल्या ‘हॉटमिक्स डांबर प्लांट’ची चौकशी महसूल प्रशासनामार्फत शनिवारपासून सुरु करण्यात आली असून, दंडात्मक कारवाई करण्याची तयारीही सुरु करण्यात आली आहे.त्यासाठी चौकशी अहवाल तातडीने सादर करण्याचा आदेश अकोल्याच्या उपविभागीय अधिकाºयांनी (एसडीओ) तहसीलदारांना दिला आहे.

Akola: 'Hotmix Plant' In The Field; Order for inuiry by 'SDO' | अकोला : शेतात विनापरवाना उभारला ‘हॉटमिक्स प्लांट’; चौकशी करण्याचे ‘एसडीओं’चे आदेश

अकोला : शेतात विनापरवाना उभारला ‘हॉटमिक्स प्लांट’; चौकशी करण्याचे ‘एसडीओं’चे आदेश

Next
ठळक मुद्देबोरगाव मंजू शिवारात भाड्याने घेतलेल्या शेतात अकृषक परवानगी न घेता विनापरवाना उभारण्यात आला आहे. ‘हॉटमिक्स डांबर प्लांट’ संदर्भात शनिवार,६ जानेवारी ‘लोकमत’मध्ये वृत प्रकाशित करण्यात आले. संबंधित कंपनीविरुध्द दंड वसूल करण्याची कारवाई करण्याची तयारी महसूल प्रशासनामार्फत सुरु करण्यात आली आहे.

- संतोष येलकर 
अकोला : बोरगाव मंजू शिवारात भाड्याने घेतलेल्या शेतात अकृषक परवानगी न घेता विनापरवाना उभारण्यात आलेल्या ‘हॉटमिक्स डांबर प्लांट’ची चौकशी महसूल प्रशासनामार्फत शनिवारपासून सुरु करण्यात आली असून, दंडात्मक कारवाई करण्याची तयारीही सुरु करण्यात आली आहे.त्यासाठी चौकशी अहवाल तातडीने सादर करण्याचा आदेश अकोल्याच्या उपविभागीय अधिकाºयांनी (एसडीओ) तहसीलदारांना दिला आहे.
बोरगाव मंजू येथे ‘हॉटमिक्स डांबर प्लांट’ उभारण्यासाठी बोरगाव मंजू येथील शेत सर्व्हे नं. २९१/२ अ आणि २९१/ २ ब मधील कमलकिशोर कन्हैयालाल अग्रवाल व जुगलकिशोर अग्रवाल यांची जमीन पुणे येथील इंटरबिल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. कंपनीमार्फत भाड्याने घेण्यात आली आहे. भाड्याने घेतलेल्या २.३६ आर.जमिनीवर संबंधित कंपनीमार्फत ‘हॉटमिक्स डांबर प्लांट’ उभारण्यात आला आहे. तसेच कंपनीचे कार्यालय, लॅबचे बांधकामही करण्यात आले आहे. परंतु, भाड्याने घेण्यात आलेल्या जमिनीवर हॉटमिक्स प्लांट सुरु करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अकृषक परवानगी घेण्यात आली नाही. कृषक जमिनीचा विना परवानगी वाणिज्य प्रयोजनासाठी अकृषक वापर करण्यात आला आहे. त्यानुषंगाने विनापरवाना उभारण्यात आलेल्या ‘हॉटमिक्स डांबर प्लांट’ संदर्भात शनिवार,६ जानेवारी ‘लोकमत’मध्ये वृत प्रकाशित करण्यात आले. या वृत्ताची दखल घेत, अकृषक परवानी न घेता उभारण्यात आलेल्या हॉटमिक्स डांबर प्लांटची सविस्तर चौकशी करुन, अहवाल तातडीने सादर करण्याचा आदेश अकोल्याचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी अकोला तहसीलदारांना ६ जानेवारी रोजी दिला. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर विना परवानगी प्लांट उभारणाºया संबंधित कंपनीविरुध्द दंड वसूल करण्याची कारवाई करण्याची तयारी महसूल प्रशासनामार्फत सुरु करण्यात आली आहे.

अकृषक परवानगी न घेता ‘हॉटमिक्स डांबर प्लांट ’ उभारण्यात आल्याने, यासंदर्भात चौकशी करुन सविस्तर अहवाल तातडीने सादर करण्याचा आदेश अकोला तहसीलदारांना देण्यात आला आहे. तसेच परवानगी न घेता कृषक जमिनीचा अकृषक वापर केल्यासंदर्भात संबंधित कंपनीविरुध्द लवकरच दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
-संजय खडसे
उपविभागीय अधिकारी, अकोला.

 

Web Title: Akola: 'Hotmix Plant' In The Field; Order for inuiry by 'SDO'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.