शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

कोल्हापुरात रोहित्रे जळण्याचे प्रमाणे केवळ चार टक्केच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 13:27 IST

mahavitaran Kolhapur- महावितरणच्या रोहित्रांच्या बाबतीत विदर्भ, मराठवाड्याच्या नेमकी उलटी परिस्थिती कोल्हापुरात आहे. तिकडे महिनों-महिने दुरुस्तीसाठी प्रतीक्षा करावी लागत असताना, कोल्हापुरात मात्र रोहित्र जळाले की जास्तीत जास्त दोन ते चार दिवसांत ती पूर्ववत होतात शिवाय रोहित्रे जळण्याचे प्रमाणही फारच अत्यल्प म्हणजे केवळ चार टक्के इतकेच आहे. शेतकऱ्यांसह महावितरणही कायम अलर्टवर असल्याचा हा परिणाम आहे.

ठळक मुद्दे दुरुस्तीही दोन चार दिवसांतच पूर्ण शेतकऱ्यांसह महावितरणही कायम अलर्टवर असल्याचा परिणाम

 कोल्हापूर: महावितरणच्या रोहित्रांच्या बाबतीत विदर्भ, मराठवाड्याच्या नेमकी उलटी परिस्थिती कोल्हापुरात आहे. तिकडे महिनों-महिने दुरुस्तीसाठी प्रतीक्षा करावी लागत असताना, कोल्हापुरात मात्र रोहित्र जळाले की जास्तीत जास्त दोन ते चार दिवसांत ती पूर्ववत होतात शिवाय रोहित्रे जळण्याचे प्रमाणही फारच अत्यल्प म्हणजे केवळ चार टक्के इतकेच आहे. शेतकऱ्यांसह महावितरणही कायम अलर्टवर असल्याचा हा परिणाम आहे.महावितरणकडून रोहित्रांच्या माध्यमातून कृषी पंपांसाठी वीजपुरवठा केला जातो. एकेका रोहित्रांवर शंभरांभर वीज कनेक्शन दिली जातात. अतिरिक्त दाब येऊन रोहित्रे जळतात, असा शोध लावत राज्यातील मागील फडणवीस सरकारने स्वतंत्र रोहित्रांचा वापर करणे बंधनकारक केले. त्यामुळे महावितरणकडे यंत्रणा कमी पडल्याने वीज जोडण्या प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर उपाय म्हणून आताच्या ठाकरे सरकारने स्वतंत्र रोहित्राची अट काढून टाकून पूर्वीप्रमाणेच एकाच रोहित्रांवर अनेक जोडण्या देण्याचे धोरण हाती घेतले आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता हा हरितपट्टा म्हणून ओळखला जात असल्याने येथे शेतकऱ्यांसह महावितरणची यंत्रणाही कायम तत्पर असते. अतिरिक्त दाब येऊ नये यासाठी भारनियमनाचे नियोजन केलेले असते, तरीदेखील काहीवेळा रोहित्रात बिघाड होण्याच्या घटना घडतात.

बिघाड झाला तर शेतकऱ्यांकडून लगेच महावितरणकडे दुरुस्तीसाठी तगादा लावला जातो. महावितरणची यंत्रणाही लगेच कामाला लागते. किमान दोन दिवस आणि जास्तीत जास्त चार दिवस एवढ्या कालावधीत वीजप्रवाह पुन्हा सुरळीत केला जातो. त्यामुळे केवळ रोहित्र जळाले म्हणून पिके वाळल्याची उदाहरणे जिल्ह्यात आढळत नाहीत.नादुरुस्त १०६०पैकी १०४४ तातडीने दुरुस्तजिल्ह्यात महावितरणकडे २६ हजार ५१७ रोहित्रे सध्या कार्यान्वित आहेत. त्यापैकी १ एप्रिल ते आजअखेरपर्यंत १ हजार ६० रोहित्रांमध्ये बिघाड झाल्याच्या घटना समोर आल्या. त्यातील १०४४ रोहित्रांची तातडीने दुरुस्तीही करण्यात आली. आता केवळ १६ रोहित्रे दुरुस्तीचे काम शिल्लक आहे. ते देखील आठवडाभरात पूर्ण करण्याचे नियोजन सुरू आहे.जिल्ह्यात कृषी ग्राहकसंख्या : १ लाख ४७ हजार ४९३एकूण ग्राहकांपैकी टक्केवारी : १३.९ टक्के

शेतकऱ्यांना एक रुपयाचाही खर्च लागू नये, पिके पाण्याअभावी जळू नयेत यासाठी रोहित्रे जळाल्यापासून ते दुरुस्तीपर्यंत यंत्रणा युद्धपातळीवर लावली जाते. दुरुस्तीमध्ये ऑईलची उपलब्धता हा मोठा घटक असतो, पण ते कमी पडू नये याची आधीच दक्षता घेतली जाते.- किशोर खोबरे, जनसंपर्क अधिकारी, कोल्हापूर परिमंडळ, महावितरण.

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर