कोल्हापुरात रोहित्रे जळण्याचे प्रमाणे केवळ चार टक्केच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 01:20 PM2020-12-25T13:20:20+5:302020-12-25T13:27:03+5:30

mahavitaran Kolhapur- महावितरणच्या रोहित्रांच्या बाबतीत विदर्भ, मराठवाड्याच्या नेमकी उलटी परिस्थिती कोल्हापुरात आहे. तिकडे महिनों-महिने दुरुस्तीसाठी प्रतीक्षा करावी लागत असताना, कोल्हापुरात मात्र रोहित्र जळाले की जास्तीत जास्त दोन ते चार दिवसांत ती पूर्ववत होतात शिवाय रोहित्रे जळण्याचे प्रमाणही फारच अत्यल्प म्हणजे केवळ चार टक्के इतकेच आहे. शेतकऱ्यांसह महावितरणही कायम अलर्टवर असल्याचा हा परिणाम आहे.

In Kolhapur, only four per cent like the burning of Rohitras | कोल्हापुरात रोहित्रे जळण्याचे प्रमाणे केवळ चार टक्केच

कोल्हापुरात रोहित्रे जळण्याचे प्रमाणे केवळ चार टक्केच

Next
ठळक मुद्दे दुरुस्तीही दोन चार दिवसांतच पूर्ण शेतकऱ्यांसह महावितरणही कायम अलर्टवर असल्याचा परिणाम

 कोल्हापूर: महावितरणच्या रोहित्रांच्या बाबतीत विदर्भ, मराठवाड्याच्या नेमकी उलटी परिस्थिती कोल्हापुरात आहे. तिकडे महिनों-महिने दुरुस्तीसाठी प्रतीक्षा करावी लागत असताना, कोल्हापुरात मात्र रोहित्र जळाले की जास्तीत जास्त दोन ते चार दिवसांत ती पूर्ववत होतात शिवाय रोहित्रे जळण्याचे प्रमाणही फारच अत्यल्प म्हणजे केवळ चार टक्के इतकेच आहे. शेतकऱ्यांसह महावितरणही कायम अलर्टवर असल्याचा हा परिणाम आहे.

महावितरणकडून रोहित्रांच्या माध्यमातून कृषी पंपांसाठी वीजपुरवठा केला जातो. एकेका रोहित्रांवर शंभरांभर वीज कनेक्शन दिली जातात. अतिरिक्त दाब येऊन रोहित्रे जळतात, असा शोध लावत राज्यातील मागील फडणवीस सरकारने स्वतंत्र रोहित्रांचा वापर करणे बंधनकारक केले. त्यामुळे महावितरणकडे यंत्रणा कमी पडल्याने वीज जोडण्या प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर उपाय म्हणून आताच्या ठाकरे सरकारने स्वतंत्र रोहित्राची अट काढून टाकून पूर्वीप्रमाणेच एकाच रोहित्रांवर अनेक जोडण्या देण्याचे धोरण हाती घेतले आहे.


कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता हा हरितपट्टा म्हणून ओळखला जात असल्याने येथे शेतकऱ्यांसह महावितरणची यंत्रणाही कायम तत्पर असते. अतिरिक्त दाब येऊ नये यासाठी भारनियमनाचे नियोजन केलेले असते, तरीदेखील काहीवेळा रोहित्रात बिघाड होण्याच्या घटना घडतात.

बिघाड झाला तर शेतकऱ्यांकडून लगेच महावितरणकडे दुरुस्तीसाठी तगादा लावला जातो. महावितरणची यंत्रणाही लगेच कामाला लागते. किमान दोन दिवस आणि जास्तीत जास्त चार दिवस एवढ्या कालावधीत वीजप्रवाह पुन्हा सुरळीत केला जातो. त्यामुळे केवळ रोहित्र जळाले म्हणून पिके वाळल्याची उदाहरणे जिल्ह्यात आढळत नाहीत.

नादुरुस्त १०६०पैकी १०४४ तातडीने दुरुस्त

जिल्ह्यात महावितरणकडे २६ हजार ५१७ रोहित्रे सध्या कार्यान्वित आहेत. त्यापैकी १ एप्रिल ते आजअखेरपर्यंत १ हजार ६० रोहित्रांमध्ये बिघाड झाल्याच्या घटना समोर आल्या. त्यातील १०४४ रोहित्रांची तातडीने दुरुस्तीही करण्यात आली. आता केवळ १६ रोहित्रे दुरुस्तीचे काम शिल्लक आहे. ते देखील आठवडाभरात पूर्ण करण्याचे नियोजन सुरू आहे.


जिल्ह्यात कृषी ग्राहकसंख्या : १ लाख ४७ हजार ४९३
एकूण ग्राहकांपैकी टक्केवारी : १३.९ टक्के


शेतकऱ्यांना एक रुपयाचाही खर्च लागू नये, पिके पाण्याअभावी जळू नयेत यासाठी रोहित्रे जळाल्यापासून ते दुरुस्तीपर्यंत यंत्रणा युद्धपातळीवर लावली जाते. दुरुस्तीमध्ये ऑईलची उपलब्धता हा मोठा घटक असतो, पण ते कमी पडू नये याची आधीच दक्षता घेतली जाते.
- किशोर खोबरे,
जनसंपर्क अधिकारी, कोल्हापूर परिमंडळ, महावितरण.

Web Title: In Kolhapur, only four per cent like the burning of Rohitras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.