शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

कोल्हापूर : विवेकानंद, गोखले कॉलेजचे प्रवेशाबाबत आॅनलाईन पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 18:03 IST

पदवी अभ्यासक्रमासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया यावर्षी विवेकानंद महाविद्यालय आणि गोपाळकृष्ण गोखले कॉलेज राबविणार आहे. त्याच्या आॅनलाईन पावलामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार असून त्रास कमी होणार आहे.

ठळक मुद्दे विवेकानंद, गोखले कॉलेजचे प्रवेशाबाबत आॅनलाईन पाऊलपदवी अभ्यासक्रमासाठी प्रक्रिया; विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार

संतोष मिठारी

कोल्हापूर : पदवी अभ्यासक्रमासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया यावर्षी विवेकानंद महाविद्यालय आणि गोपाळकृष्ण गोखले कॉलेज राबविणार आहे. त्याच्या आॅनलाईन पावलामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार असून त्रास कमी होणार आहे.कोल्हापूर शहरातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया गेल्या पाच वर्षांपासून केंद्रीय पद्धतीने राबविली जात आहे. त्याचा चांगला परिणाम झाला आहे. त्या पद्धतीने पदवी अभ्यासक्रमासाठी केंद्रीय आणि आॅनलाईन प्रक्रिया राबविण्याची मागणी विद्यार्थी, पालकांतून गेल्या तीन वर्षांपासून होत आहे.

ही मागणी लक्षात घेऊन यावर्षी विवेकानंद महाविद्यालय आणि गोखले कॉलेजने पदवी अभ्यासक्रमासाठी आॅनलाईन प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. विवेकानंद महाविद्यालयातर्फे पदवी प्रथम वर्षासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया गेल्या चार दिवसांपासून सुरू केली आहे. त्यात प्रवेश भरणे, गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यासह शुल्क भरण्याची प्रक्रिया आॅनलाईन होणार आहे.

गोखले कॉलेज यावर्षी बारावी आणि पदवी द्वितीय, तृतीय वर्षासाठी आॅनलाईन प्रक्रिया राबवत आहे. या प्रक्रियेअंतर्गत कॉलेजमधील बारावीचे ८० टक्के प्रवेश पूर्ण झाले आहेत. द्वितीय वर्षाची प्रक्रिया दि. १८ जूनपासून सुरू होणार आहे. त्यानंतर तृतीय वर्षाची प्रक्रिया होईल. प्रवेश प्रक्रियेबाबत या महाविद्यालयातील टाकलेले आॅनलाईनचे पाऊल विद्यार्थ्यांसाठी उपयोगी ठरणारे आहे.

विविध सूचना देण्याची सुविधामहाविद्यालयातून अर्ज घेणे, तो भरून पुन्हा जमा करणे. प्रवेश शुल्क भरणे, अर्जांची छाननी करून गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे. त्यानंतर प्रत्यक्ष प्रवेश देणे अशी प्रक्रिया सध्या राबविली जाते. त्यात किमान तीन आठवडे जातात. या प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना वारंवार महाविद्यालयांमध्ये यावे लागते. त्यात त्यांचा वेळ आणि पैसा खर्च होतो.

ते टाळण्याच्या अनुषंगाने विवेकानंद महाविद्यालय, गोखले कॉलेज यांनी आॅनलाईन प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. आॅनलाईन पद्धतीमुळे या महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रियेला गती मिळणार आहे. त्यासह या प्रक्रियेतील विविध सूचना ‘एसएमएस’द्वारे विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. 

प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांसाठी अधिक सोयीस्कर व्हावी म्हणून आमच्या महाविद्यालयाने पदवी प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन केली आहे. टप्प्या-टप्याने त्याची व्याप्ती वाढविण्यात येईल.-प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर,विवेकानंद महाविद्यालय

 

टॅग्स :collegeमहाविद्यालयonlineऑनलाइनkolhapurकोल्हापूरEducation Sectorशिक्षण क्षेत्र