शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : गोकुळशिरगाव येथे एकाचा होरपळून मृत्यू ; तीन केबिनही खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 12:23 IST

गोकुळशिरगाव एम.आय.डी.सी.फाटयावर औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या सेवा मार्गावरील रस्त्याशेजारी व्यावसायिकांच्या असलेल्या तीन लाकडी केबिन (खोकी) खाक झाल्या. यामध्ये एका व्यक्तीचा होरपळून जागीच मृत्यू झाला. यामध्ये केबिनचे तीस हजारांहून अधिक नुकसान झाले.

ठळक मुद्देतीन खोक्यांना लागली अचानक आगऔद्योगिक वसाहतीमधील कर्मचारी घरी जात असताना घटना निदर्शनास घटनास्थळी पोलिसांनी दिली भेट, अग्निशमन दलाला पाचारण

कणेरी : गोकुळशिरगाव एम.आय.डी.सी.फाटयावर औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या सेवा मार्गावरील रस्त्याशेजारी व्यावसायिकांच्या असलेल्या तीन लाकडी केबिन (खोकी) खाक झाल्या. यामध्ये एका व्यक्तीचा होरपळून जागीच मृत्यू झाला. यामध्ये केबिनचे तीस हजारांहून अधिक नुकसान झाले. आग कागल पंचातारांकित औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन दलाने आटोक्यात आणली. ही घटना बुधवारी रात्री बाराच्या सुमारास घडली. आग नेमकी कशाने लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.याबाबत घटनास्थळावरून व गोकुळशिरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोकुळशिरगाव एम.आय.डी.सी.फाट्यावर औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या सेवा मार्गावरील रस्त्याशेजारी काही व्यावसायिक खोकी आहेत. यामध्ये मध्यभागी असलेल्या तीन खोक्यांना बुधवारी रात्री बाराच्या सुमारास अचानक आग लागली.

लाकडी बांबू, तट्टे आणि पत्र्याचा वापर करून ही खोकी तयार करण्यात आली आहेत. यातील एका खोक्यात मटक्याचा, तर दुसऱ्या खोक्यात मोटारसायकल पंक्चर आणि चपलांचा व्यवसाय केला जात होता. तर तिसऱ्या खोक्यात वाहनांच्या कोचिंगचे काम केले जात होते. ही तिन्ही खोकी खाक झाली आहेत.

यामध्ये एका चाळीस ते पंचेचाळीस वयोगटाच्या अज्ञात व्यक्तीचा होरपळून जागीच मृत्यू झाला. रात्री बारा वाजता औद्योगिक वसाहतीमधील कर्मचारी कामावरून घरी जात असताना त्यांच्या निदर्शनास ही घटना आली. त्यांनी याबाबतची माहिती गोकुळशिरगाव पोलिसांना दिली.

घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन अग्निशमन दलाला पाचारण केले. तोपर्यंत दोन खोकी खाक झाली होती. मटक्याच्या खोक्यात अज्ञात व्यक्ती झोपली होती. त्याचा आगीत होरपळून मृत्यू झाला. अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली.

दरम्यान, करवीरचे विभागीय पोलीस अधिकारी सूरज गुरव यांनी भेट देऊन घटनेची पाहणी केली. आगीच नेमक कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. तसेच मृत व्यक्तीची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आलेले नाही. गुरुवारी सकाळी नागरिकांनी घटनास्थळी पाहण्यासाठी गर्दी केली होती. या घटनेची नोंद गोकुळशिरगाव पोलिसांत झाली असून, अधिक तपास स.पो.नी. संजय नागरगोजे करीत आहेत.

गोकुळशिरगाव एम.आय.डी.सी.फाट्यावर औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या सेवा मार्गावरील रस्त्याशेजारील तीन खोकी खाक झाली. यामध्ये एका अज्ञात व्यक्तीचा होरपळून जागीच मृत्यू झाला. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfireआग