शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर शस्त्राने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 17:42 IST

 दुचाकीवरून शिकवणीला जात असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी एका अल्पवयीन मुलीची दुचाकी अडवून त्यांतील एकाने तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना कोल्हापुरातील शाहूपुरी एक्स्टेन्शन रस्त्यावर गुरुवारी सकाळी घडली. या हल्ल्यात संबंधित मुलगी किरकोळ जखमी झाली आहे.

ठळक मुद्देशिकवणीला जात असताना धारदार शस्त्राने हल्ला हल्लेखोर पसार, दुचाकी अडवून केले कृत्य शाहूपुरी एक्स्टेन्शन परिसरातील घटनाअल्पवयीन मुलीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू

कोल्हापूर  , दि. २६ : दुचाकीवरून शिकवणीला जात असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी एका अल्पवयीन मुलीची दुचाकी अडवून त्यांतील एकाने तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना कोल्हापुरातील शाहूपुरी एक्स्टेन्शन रस्त्यावर गुरुवारी सकाळी घडली. या हल्ल्यात संबंधित मुलगी किरकोळ जखमी झाली असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेनंतर नागरिकांची गर्दी होताच अज्ञात दोघे तरुण त्यांच्या दुचाकीवरून पसार झाले. याबाबतची फिर्याद संबंधित मुलीने दुपारी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली. संशयित हल्लेखोर अज्ञात तरुण अंदाजे २० ते २२ वर्षांचा आहे. त्याने निळ्या रंगाची जिन्स आणि फिकट रंगाचा शर्ट परिधान केला असून, त्याने बारीक दाढी राखल्याचे वर्णन या मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबात केले आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, शहरातील एका उच्चभ्रू वस्तीतील ही अल्पवयीन मुलगी आईवडिलांसमवेत राहते. ती सध्या शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेते. तसेच ती शाहूपुरी परिसरात दुचाकीवरून शिकवणीला येते. दोन महिन्यांपासून आपल्या मागावर एक अज्ञात तरुण असल्याची जाणीव त्या मुलीला झाली होती. काही दिवसांनंतर संबंधित तरुणाने एकतर्फी प्रेमातून धमकी दिली. दरम्यान, हा प्रकार तिने घरच्यांना सांगितला.

गुरुवारी सकाळी संबंधित मुलगी दुचाकीवरून शाहूपुरी एक्स्टेन्शन येथील रस्त्यावरून शिकवणीला जात होती. याच वेळी अज्ञात दोघे तरुण काळ्या रंगाच्या दुचाकीवरून तिच्याजवळ आले व त्यांनी आपली दुचाकी तिच्या दुचाकीच्या आडवी घालून तिला अडविले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे ती मुलगी भांबावली.

एकतर्फी प्रेमातून अज्ञात तरुणाने अल्पवयीन मुलीच्या हातावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात ती जखमी झाली. याच सुमारास तेथील रस्त्यावरून दोन नागरिक जात होते. मुलीने आरडाओरड करीत मदतीसाठी त्यांना हाक मारली.

ते दोघेजण येताच अज्ञात हल्लेखोर पसार झाले. नागरिकांनी तिला जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. रुग्णालयाने हा प्रकार पोलिसांना कळविला. त्यानंतर पोलिसांनी संबंधित मुलीचा जबाब घेतला. त्यानुसार अज्ञाताविरोधात भारतीय दंडविधान संहिता कलम ३५४ (ड) (विनयभंग), कलम ३२४ (मारहाण), कलम ५०६ (धमकी), इ कलम ३४ (समान हेतू) अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाले आहेत.

अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरूभरदिवसा झालेल्या या प्रकारामुळे शाहूपुरी एक्स्टेन्शन परिसरात एकच खळबळ उडाली. संबंधित मुलीच्या तक्रारीनंतर पोलीस अज्ञात संशयित हल्लेखोरांचा शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

 

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस