शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ओम नम: शिवायचा जप, तिसऱ्या श्रावण सोमवारी महादेव मंदिरात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 17:24 IST

महाअभिषेक, सत्यनारायण पूजा, तीर्थप्रसाद वाटप, शिवलिलामृत वाचन, ओम नम: शिवायचा जाप, भजन, किर्तन अशा विविध धार्मिक उपक्रमांनी तिसरा श्रावण सोमवार पार पडला. यानिमित्त शहरातील विविध महादेव मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी होती.

ठळक मुद्दे कैलासगडची स्वारी मंदिरात ओम नम: शिवायचा जपतिसऱ्या श्रावण सोमवारी महादेव मंदिरात गर्दी

कोल्हापूर : महाअभिषेक, सत्यनारायण पूजा, तीर्थप्रसाद वाटप, शिवलिलामृत वाचन, ओम नम: शिवायचा जप, भजन, किर्तन अशा विविध धार्मिक उपक्रमांनी तिसरा श्रावण सोमवार पार पडला. यानिमित्त शहरातील विविध महादेव मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी होती.श्रावण महिन्यात भगवान शंकराची उपासना केली जाते. त्यात तिसरा श्रावण सोमवारला विशेष महत्व आहे. इतर सोमवारी व्रतस्थ राहणे नाही जमले तर अनेक लोक तिसरा श्रावण सोमवार करतात.

यानिमित्त कैलासगडची स्वारी मंदिरात पहाटे धार्मिक विधीने शिवास अभिषेक करण्यात आला. दुपारी सत्यनारायण महापूजा व तीर्थप्रसादाचे वाटप झाले. सायंकाळी विठ्ठलपंथी महिला भजनी मंडळाने भजन सादर केले. त्यानंतर श्रीमान योगी या छत्रपती शिवरायांच्या चरित्र ग्रंथाचे वाचन झाले.नागाळा पार्क येथील श्री बालकृष्णजी की हवेली येथे सायंकराळी हिंडोळा विजय दर्शन, आरती, सेवा असे धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. याशिवाय अंबाबाई मंदिरातील मातृलिंग, अतिबलेश्वर, वटेश्वर, पंचगंगा नदी घाटावरील महादेव मंदिरे, कोल्हापुरातील सर्वात मोठे शिवलिंग असलेले उत्तरेश्वर मंदिर, ऋणमुक्तेश्वर अशा विविध महादेव मंदिरात भाविकांची अलोट गर्दी होती.

तर मंदिराबाहेर फळ, फूल, बेल, केळी अशा पूजेच्या साहित्यांची दुकाने थाटली होती. काही मंदिरांमध्ये भाविकांना केळ, राजगिरा लाडू, खिचडी या फराळाचे वाटप केले जात होते.

कुमारिका पूजन, देवतांना नैवेद्यश्रावण महिन्यात घरोघरी कुमारिकांचे पूजन केले जाते. लहान मुलींना घरी बोलावून त्यांना हळदी-कुंकू, पान-सुपारी देवून सुग्रास जेवण वाढले जाते. त्यामुळे गल्लोगल्लीतल्या घराघरात हा कुमारिका पूजन सोहळा सुरू होता. सगळीकडूनच बोलावणे आल्याने या लहान मुलींची मात्र उत्साही लगबग सुरू होती. या महिन्यात शहरातील सर्व देव-देवतांना पुरणपोळीचा नैवेद्य करण्याची पद्धत आहे. त्यामुळे अनेक कुटूंबात पूरणपोळीचा बेत करण्यात आला होता. 

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलReligious programmeधार्मिक कार्यक्रमkolhapurकोल्हापूर