शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : महाराष्ट्र शेतकरी संघटना सुकाणू समितीतर्फे अन्नत्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 11:29 IST

१९ मार्च १९८६ ला साहेबराव करपे या शेतकऱ्यांने आपल्या कुटुंबियांसमवेत सामुदायिक आत्महत्या केली. राज्यातील ही पहिलीच शेतकरी आत्महत्या होती. या आत्महत्या दिनानिमित्त सोमवारी महाराष्ट्र शेतकरी संघटना सुकाणू समितीतर्फे राज्यभर अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देमहाराष्ट्र शेतकरी संघटना सुकाणू समितीतर्फे अन्नत्याग आंदोलनशेतकऱ्यांनी न्यायासाठी संघर्षाची तयारी ठेवावी : संपतराव पवार-पाटील 

कोल्हापूर : गेल्या ३३ वर्षांपासून अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून, त्या आजही थांबलेल्या नाहीत. पूर्वीचे व सध्याचे सरकार शेतकरीभिमुख निर्णय घेऊ शकत नसल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी न्याय हक्कासाठी संघर्षाची तयारी ठेवावी, असे आवाहन माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी येथे केले. भाजपा सरकार हे शेतकरी विरोधी असून, मागण्या मान्य न झाल्यास हे सरकार उलथवून टाकण्याचा इशाराही नेत्यांनी यावेळी दिला.१९ मार्च १९८६ ला साहेबराव करपे या शेतकऱ्यांने आपल्या कुटुंबियांसमवेत सामुदायिक आत्महत्या केली. राज्यातील ही पहिलीच शेतकरी आत्महत्या होती. या आत्महत्या दिनानिमित्त सोमवारी महाराष्ट्र शेतकरी संघटना सुकाणू समितीतर्फे राज्यभर अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.

त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभर अन्नत्याग आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनात शेतकरी कामगार, जनता दल, अ. भा. किसान सभा, लाल निशान पक्ष, रघुनाथदादा पाटीलप्रणित शेतकरी संघटना, शरद जोशीप्रणित शेतकरी संघटना, आॅल इंडिया स्टुंडट्स फेडरेशन, आॅल इंडिया यूथ फेडरेशन, आदी पक्ष, संघटना सहभागी झाल्या होत्या.यावेळी संपतराव पवार-पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळून त्यांचे जीवनमान व दर्जा उंचावला पाहीजे. यासाठी शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात संघर्षाची भूमिका घेतली पाहिजे. आजपर्यंत ७५ हजार शेतकऱ्यांनी राज्यात आत्महत्या केल्या आहेत. या सर्व आत्महत्या राज्यकर्त्यांच्या धोरणामुळेच झाल्या आहेत. सध्याचे भाजपा सरकार हे शेतकरी विरोधी असून, या सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. त्याविरोधात विविध पक्ष, शेतकरी संघटना आंदोलन करीत आहेत.

या आंदोलनातून मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्रव्यापी आंदोलन आक्रमक करून हे सरकार उलथवून टाकण्याचा इशारा अतुल दिघे, मारुती जाधव (गुरुजी), वसंत पाटील, प्राचार्य टी. एस. पाटील, नामदेव गावडे, भारत पाटील, ए. डी. अत्तार, सतीशचंद्र कांबळे, गिरीष फोंडे, अ‍ॅड. माणिक शिंदे, आदी नेत्यांनी आपल्या भाषणात दिला. तसेच शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव द्या, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करा, बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांना पेन्शन द्या, जमीन अधिग्रहणाची सक्ती थांबवा, अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या.यावेळी विठ्ठलराव खोराटे, बाबासाहेब देवकर, रवी जाधव, बी. एल. बरगे, अ‍ॅड. अरुण सोनाळकर, दिनकर सूर्यवंशी, अशोकराव पवार-पाटील, पार्वती तोरस्कर, दीपाली कोळी, नारायण पोवार, गुणाजी शेलार, सुनीता अमृतसागर, सुशांत बोरगे, संजय पाटील, आदी मान्यवर उप

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी