शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : भिंतीआड आयुष्य कंठणाऱ्या नऊ कैद्यांची सुटका, नातेवाईकांची गळाभेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 18:29 IST

गेली अडीच वर्ष कुटूंबापासून दूर असलेल्या आणि कारागृहाच्या भिंतीआड आयुष्य कंठणाºया नऊ कैद्यांची कळंबा मध्यवर्ती कारागृहातून शुक्रवारी सुटका झाली. कारागृहाच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडताच समोर स्वागतासाठी उभ्या असलेल्या आपल्या नातेवाईकांना पाहून सर्वांचाच कंठ भरुन आला. त्यांनी गळ्यात पडून आपल्या आनंदाश्रुंना वाट मोकळी करुन दिली.

ठळक मुद्देभिंतीआड आयुष्य कंठणाऱ्या नऊ कैद्यांची सुटकानातेवाईकांची गळाभेट, आनंदाश्रुंना वाट मोकळी करुन दिली

कोल्हापूर : गेली अडीच वर्ष कुटूंबापासून दूर असलेल्या आणि कारागृहाच्या भिंतीआड आयुष्य कंठणाºया नऊ कैद्यांची कळंबा मध्यवर्ती कारागृहातून शुक्रवारी सुटका झाली. कारागृहाच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडताच समोर स्वागतासाठी उभ्या असलेल्या आपल्या नातेवाईकांना पाहून सर्वांचाच कंठ भरुन आला. त्यांनी गळ्यात पडून आपल्या आनंदाश्रुंना वाट मोकळी करुन दिली. कारागृह प्रशासनाकडून वीस कैद्यांची यादी शासनाला सादर केली होती. त्यापैकी नऊ कैद्यांच्या सुटकेला शासनाने मंजूरी दिली. त्यानुसार गांधी जयंती निमित्त कारागृहात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शुक्रवारी समारोप कार्यक्रमास सेवानिवृत्त कारागृह उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांची उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते शिक्षा माफ झालेल्या कैद्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी कैद्यांना गांधीच्या जिवनावरील पुस्तक भेट देण्यात आले. यावेळी निवृत्त उपमहानिरीक्षक धामणे यांनी प्रत्येकाने आयुष्यात संयम पाळला पाहिजे. आपला अहंकार नडल्याने रागाच्या भारात गुन्हा घडून जातो. परंतू त्यांची शिक्षा तुमच्यासह कुटूंबालाही भोगावी लागले. या चक्रव्युहात संपूर्ण कुटूंब उध्दवस्थ होते. सुखान जगा, दूसऱ्यांना जगवा, अर्धी भाकरी खायाला नाही मिळाली तरी चालेल परंतु समाधानान जगा, मोकळ्या वातावरणात निवांत रहा असा मौलिक संदेश यावेळी दिला.यांची झाली सुटकामाया भीमराव कांबळे (रा. वय ५०, रा. बत्तीस शिराळा, जि. सांगली), त्यांचा मुलगा महेश (२८), विशाल रवींद्र वारे (३०), लाला नंदू मदने (४०, दोघे रा. वडूज, जि. सातारा), नितीन अग्रवाल ऊर्फ नीतेशकुमार भोलेनाथ विश्वकर्मा (४०, रा. दारूर-गुजरात), धनाजी घोडके, संतोष केशव चाळके (खंडाळा), संजय शहाजी क्षीरसागर (कोल्हापूर), बबनराव ज्ञानू शिंदे (सांगली) 

 

टॅग्स :jailतुरुंगkolhapurकोल्हापूर