शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

दरीतला रस्ता गाठला आणि धावत्या स्कूल बसमध्ये चालकाला हृदयविकाराचा झटका आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 22:51 IST

चालकाला त्रास होत असतानाही प्रसंगावधान राखत त्यांनी विद्यार्थ्यांचे प्राण वाचवले.

राजेंद्र पाटीलभोगावती : पिंपळवाडी (ता राधानगरी) या गावातील भोगावती हायस्कूलच्या शालेय विद्यार्थ्यांना घेऊन येत असलेल्या बसचा चक्क काळ पाठलाग करत होता. खोल दरी असलेला अर्धा किलोमीटरचा रस्ता पार करून आल्यानंतर बसचालक सतीश सातापा कांबळे (वय ३५) रा.कौलव याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. अवघ्या मिनिटापूर्वीच बसने दरीचा भाग पार केला होता. 

याबाबत सविस्तर घटना अशी आहे, पिंपळवाडी येथून भोगावती हायस्कूल ला येण्यासाठी एक किलोमीटर पायी प्रवास करून गाडी पकडावी लागते. विद्यार्थ्यांची ही गैरसोय टाळण्यासाठी भोगावती हायस्कूलच्या वतीने या विद्यार्थ्यांना बसची सोय करण्यात आलेली होती. मात्र आज प्रचंड मोठी दुर्घटना टळली. पिंपळवाडी ते भोपळवाडी दरम्यान मोठी दरी आहे. हा रस्ता एकेरी वाहतुकीचा आहे.त्यामुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. आज दुपारी या दीड किलोमीटरच्या मार्गावर ही बस पिंपळवाडी येथून विद्यार्थ्यांना घेऊन बरगेवाडी पोहचत असतानाच चालकाला हृदय विकाराचा तीव्र झटका आला. परंतु असं असतानाही विद्यार्थ्यांचे प्राण वाचावे यासाठी त्यांनी प्रयत्न करत चालू गाडी बंद करून प्राण सोडला.

सतीश कांबळे यांच्या मृत्यूनंतर या बसमधून प्रवास केलेल्या मुलांचा व पालकांचा एकच कल्लोळ उडाला. महिलांना रडू आवरेना तर विद्यार्थी थरथर कापत होते. एवढी भीतीदायक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली होती. तात्काळ बस चालकाला कोल्हापुरातील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु त्यांचा मृत्यू झाला. सतीश कांबळे यांच्या पश्चात पत्नी दोन लहान मुले असा परिवार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर