शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण विधानसभा मतदारसंघात रंगलय पोस्टरवॉर; विकासकामांच्या पंचनाम्यावरून कलगीतुरा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2024 14:49 IST

वर्दळीच्या रस्त्यारस्त्यावर प्रत्येक प्रभागात ग्रामपंचायती नजीक एकमेकांविरुद्ध उभारण्यात आलेल्या विकासकामांचा पंचनामा करणाऱ्या पोस्टरने दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे.

अमर पाटील

कोल्हापूरकळंबा पालिका हद्दीतील समाविष्ट विविध प्रभाग आणि लगतच्या ग्रामपंचायती यांची सरमिसळ होऊन बनलेल्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात आमदार ऋतुराज पाटील यांच्या ' वारसा विकासाचा दक्षिणच्या प्रगतीचा' विरुद्ध माजी आमदार अमल महाडिक यांच्या दक्षिण' प्रॉब्लेम अशा आशयाची पोस्टरे सर्वत्र झळकत आहेत. वर्दळीच्या रस्त्यारस्त्यावर प्रत्येक प्रभागात ग्रामपंचायती नजीक एकमेकांविरुद्ध उभारण्यात आलेल्या विकासकामांचा पंचनामा करणाऱ्या पोस्टरने दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे.

पक्षीय राजकारणा आडून पुन्हा पारंपरिक पाटील महाडिक गटात एकमेकांच्या विकासकामांचे वाभाडे काढण्याची चांगलीच जुंपली आहे. पाच वर्षे शांत असणाऱ्या मतदारसंघातील पाटील महाडिक गटाचे राजकारण पुन्हा ढवळून निघायला सुरवात झाली आहे. मतदारसंघात विकासकामांच्या निमित्ताने गाठीभेटीला सुरवात झाली आहे. जिल्ह्यातील संवेदनशील दक्षिण विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे.

२००९ च्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेत कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली होती. त्यावेळी सतेज पाटील यांनी बाजी मारली २०१४ च्या निवडणुकीत सतेज पाटील यांना पराभूत करत नवख्या अमल महाडिक यांनी विजय मिळवला. २०१९ च्या निवडणुकीत ऋतुराज पाटील यांनी अमल महाडीकांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. येथे मतदारसंघात मतदारांचा कौल सहजासहजी लक्षात येते नाही, गेल्या तिन्ही निवडणुकीत प्रत्येकवेळी वेगवेगळे उमेदवार निवडून आले आहेत हे विशेष . परंतु पक्षीय राजकारण पाहता दोन वेळा काँग्रेस तर भाजप एकदा विजय मिळवला आहे.

चाणाक्ष मतदारराजाच ठरवेल

येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विजयाची हॅट्ट्रिक करणार की भाजप कमबॅक करणार हे गुलदस्त्यात असले तरी निवडणूकीआधी सुरू झालेल्या पोस्टरवॉरने निवडणूकीआधी राजकारण ढवळून निघाले आहे.   खरी दंगल पाटील- महाडिक गटातच दक्षिण विधानसभा मतदारसंघात पक्षीय राजकारणापेक्षा गतातटाची समीकरणे प्रभावी ठरतात. येथे पाटील- महाडिक गट अशीच निवडणूक रंगते आमदार ऋतुराज पाटील दुसऱ्यांदा बाजी मारणार की दुसऱ्यांदा अमल महाडीक कमबॅक करणार हे चाणाक्ष मतदारराजाच ठरवेल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर