शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

कोल्हापूर : न्यूझीलंडचे ‘ड्रॅगन फ्रुट’ बाजारात, ‘वरण्या’ची आवक वाढल्याने दरात घसरण : साखर, गूळ तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 11:25 IST

डेंग्यूमूळे शरीरातील रक्तपेशी कमी होतात. त्यांची भरपाई करण्यासाठी ‘किव्ही’ फळ खाण्यास दिले जाते. आता ‘किव्ही’बरोबरच न्यूझीलंड येथील ‘ड्रॅगन फ्रुट’ बाजारात आले आहे. गडद रंगाचे हे फळ ग्राहकांचे आकर्षण बनले आहे. भाजीपाला मार्केटमध्ये मोठी चढउतार दिसत नसली तरी ‘वरण्या’ची आवक वाढल्याने त्याच्या दरात थोडी घसरण झाली आहे. साखर व गुळाच्या दरांत थोडी वाढ झाली आहे.

ठळक मुद्देन्यूझीलंडचे ‘ड्रॅगन फ्रुट’ बाजारात, साखर, गूळ तेजीत ‘वरण्या’ची आवक वाढल्याने दरात घसरण

कोल्हापूर : डेंग्यूमूळे शरीरातील रक्तपेशी कमी होतात. त्यांची भरपाई करण्यासाठी ‘किव्ही’ फळ खाण्यास दिले जाते. आता ‘किव्ही’बरोबरच न्यूझीलंड येथील ‘ड्रॅगन फ्रुट’ बाजारात आले आहे. गडद रंगाचे हे फळ ग्राहकांचे आकर्षण बनले आहे. भाजीपाला मार्केटमध्ये मोठी चढउतार दिसत नसली तरी ‘वरण्या’ची आवक वाढल्याने त्याच्या दरात थोडी घसरण झाली आहे. साखर व गुळाच्या दरांत थोडी वाढ झाली आहे.कोल्हापूर शहराला डेंग्यूच्या आजाराने विळखा घातला आहे. डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांवर वैद्यकीय उपचार सुरू असतानाच त्यांच्या शरीरातील रक्तपेशी गतीने वाढाव्यात, यासाठी ‘किव्ही’ फळ खाण्यास दिले जाते.‘किव्ही’बरोबरच ‘ड्रॅगन फ्रुट’ही दिले जाते. ‘ड्रॅगन’ हे फळ न्यूझीलंड येथील असून, सध्या कोल्हापूर बाजार समितीत त्याची आवक झालेली आहे. दिसायला लहान अननसासारखे असणारे हे फळ वरून सोलले की आत ‘गर’ असतो. तो खाण्यास दिल्यानंतर रक्तपेशी वाढतात. साधारणत: एक फळाची किंमत ५० रुपये आहे. पपईलाही मागणी असून पिवळीधमक पपई बाजारात दिसत आहेत.

फळबाजारात अननस, तोतापुरी, डाळिंब या फळांची रेलचेल दिसते. दूध आंदोलन, मराठा आरक्षण आंदोलन व त्यानंतर वाहतूकदारांच्या संपामुळे फळबाजारात शांतता होती. गेले दोन दिवस मालाची आवक हळूहळू होऊ लागली आहे. चेन्नई, बंगलोर येथून तोतापुरी आंब्यांची आवक सुरू असून आंब्याचा दर दहा ते वीस रुपयांपर्यंत आहे. नीलम आंब्याची आवकही अद्याप सुरू असून बॉक्स दर ५० रुपये आहे.भाजीपाला बाजारावरही वाहतूकदार संपाचा परिणाम झाल्याने आवक मंदावली आहे; पण आता आवक पूर्ववत सुरू झाल्याने दरात फारसा चढउतार दिसत नाही. कोबी, वांगी, टोमॅटो, गवार, वरणा या प्रमुख भाज्यांच्या दरांत थोडी घसरण झाली आहे.

‘वरणा’ची आवक जास्त असल्याने दर एकदमच खाली आले आहेत. किरकोळ बाजारात वरणा २० रुपये किलोपर्यंत आलेला आहे. कोथिंबिरीची आवक स्थिर असल्याने दरात फारसा फरक दिसत नाही. कांदापात, मेथी व पोकळा या भाज्या १० रुपये प्रतिपेंढी आहेत.हरभरा डाळीच्या दरात थोडी वाढ झाली असून तूरडाळ, मसूरडाळीसह इतर डाळींचे दर स्थिर आहेत. घाऊक बाजारात साखर ३४ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. गुळाची मागणीही वाढू लागल्याने दर ३२ रुपयांपर्यंत दर आहे. सरकी तेल, शेंगतेलाच्या दरात चढउतार दिसत नाही.श्रावणाच्या पार्श्वभूमीवर शाबू वधारणारसध्या शाबूसह उपवासाच्या पदार्थांचे दर स्थिर असले तरी श्रावणाच्या पार्श्वभूमीवर दर वाढणार हे निश्चित आहे. शाबूचे दर सध्या हळूहळू चढू लागले आहेत.

 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर