कोल्हापूर ते नंदवाळ दिंडी वाहनातून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:28 IST2021-07-14T04:28:47+5:302021-07-14T04:28:47+5:30
कोल्हापूर : आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी काढली जाणारी कोल्हापूर ते नंदवाळ पालखी दिंडी यंदा कोरोनामुळे वाहनातून काढण्यात येणार आहे. पायी ...

कोल्हापूर ते नंदवाळ दिंडी वाहनातून
कोल्हापूर : आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी काढली जाणारी कोल्हापूर ते नंदवाळ पालखी दिंडी यंदा कोरोनामुळे वाहनातून काढण्यात येणार आहे. पायी वारीची परंपरा खंडित होऊ नये म्हणून प्रशासनाने परवानगी दिली तर खंडोबा तालीमपर्यंत पायी जाणार असल्याची माहिती, श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा भक्त मंडळाचे अध्यक्ष दीपक गौड, ह.भ.प आनंदराव लाड महाराज व बाळासो पोवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
यंदा आषाढी एकादशी २० जुलैला आहे. भक्त मंडळ व जय शिवराव फुटबॉल प्लेअर तरुण मंडळाच्यावतीने कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर असलेल्या नंदवाळ येथे पायी दिंडी काढली जाते. जिल्ह्यातील पंचक्रोशीतील ११० हून अधिक गावांतील हजारो वारकरी यात सहभागी होतात. मात्र, गेल्यावर्षी सुरू झालेल्या कोरोनामुळे यंदा सलग दुसऱ्या वर्षी माऊलींची पालखी वाहनातून काढण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे. वारीत माऊलींचे अश्व, मानकरी व २० माणसांचा सहभाग असेल. दिंडी दरम्यान मास्क, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले जाईल. कोरोनाच्या धर्तीवर भक्तांनी सहकार्य करावे, असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले.
या वेळी गिर्यारोहक कस्तुरी सावेकर हिचा सत्कार करण्यात आला. परिषदेला ह.भ. प. एम. पी. पाटील, ॲड. राजेंद्र किंकर, गंगाधर दास, सखाराम चव्हाण, संभाजी पाटील, रामचंद्र हजारे, संतोष रांगोळे, अजित चव्हाण, भगवान तिवले, बाळासो गुरव उपस्थित होते.
---
७.१५ : मिरजकर तिकटी विठ्ठल मंदिर येेथे मान्यवरांच्या हस्ते पालखी पूजन व आरती
७.३० : बिनखांबी गणेश मंदिर, उभा मारुती चौक ते खंडोबा तालीमपर्यंत दिंडी पायी
८.३० : तीन वाहनांतून नंदवाळकडे दिंडी रवाना
नगरप्रदक्षिणा, प्रवचन रद्द
दिंडी सकाळी लवकरत निघत असल्याने जिल्ह्यातील वारकरी आदल्या दिवशी कोल्हापुरात दाखल होतात. शहरातून नगरप्रदक्षिणा काढली जाते व सासणे इस्टेट येथे रात्री कीर्तन-प्रवचन होते. यंदा कोरोना निर्बंधांमुळे हा सोहळा रद्द करण्यात आला.
----