कोल्हापूर-नागपूर, दिल्ली मार्गावरील रेल्वे जुलैमध्ये धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:17 IST2021-06-28T04:17:34+5:302021-06-28T04:17:34+5:30
सध्या कोल्हापूरमधून कोल्हापूर-गोंदिया (महाराष्ट्र एक्स्प्रेस), कोल्हापूर-तिरूपती आणि दर शुक्रवारी कोल्हापूर-धनबाद (दीक्षाभूमी एक्स्प्रेस) या रेल्वे सुरू आहेत. यातील ...

कोल्हापूर-नागपूर, दिल्ली मार्गावरील रेल्वे जुलैमध्ये धावणार
सध्या कोल्हापूरमधून कोल्हापूर-गोंदिया (महाराष्ट्र एक्स्प्रेस), कोल्हापूर-तिरूपती आणि दर शुक्रवारी कोल्हापूर-धनबाद (दीक्षाभूमी एक्स्प्रेस) या रेल्वे सुरू आहेत. यातील धनबाद रेल्वेने गेल्या दोन महिन्यांत कोल्हापूरमधून उत्तर प्रदेश, बिहार, गया आदी ठिकाणी परराज्यातील कामगार, मजूर हे कुटुंबासह रवाना झाले. अन्य मार्गांवरील सेवा गेल्या तीन महिन्यांपासून स्थगित आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी येत असल्याने देशातील काही मार्गांवरील रेल्वे सेवा पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यानुसार दि.२ जुलैपासून कोल्हापूर-नागपूर (व्हाया पंढरपूर, कुर्डूवाडी) ही रेल्वे सेवा सुरू होईल. दर सोमवारी, शुक्रवारी ही सेवा असणार आहे. कोल्हापूर-दिल्ली (निजामुद्दीन एक्स्प्रेस) रेल्वे दि. ६ जुलैपासून सुरू होईल. दर मंगळवारी कोल्हापूरहून ही रेल्वे सुटणार आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
चौकट
या रेल्वे सुरू कराव्यात
कोल्हापूर-मुंबई (कोयना एक्स्प्रेस) ही रेल्वे सुरू करण्याच्या हालचाली मध्य रेल्वेकडून सुरू आहेत. कोल्हापूर-मुंबई (महालक्ष्मी एक्स्प्रेस), कोल्हापूर-अहमदाबाद मार्गावरील रेल्वे आणि कोल्हापूर-सातारा मार्गावरील पॅसेंजर रेल्वे लवकर सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांतून होत असल्याचे पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी रविवारी सांगितले.