कोल्हापूर : मुलगी नको म्हणून नातीचा खून, आजीला कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 22:50 IST2018-10-08T21:34:25+5:302018-10-08T22:50:01+5:30

आजारपणाचे निमित्त पुढे करून मुलगी नको होती, या कारणातूनच नातीचा गळा आवळून खून केल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आजी

Kolhapur: The murder of the girl for not wanting the girl, the grandfather koli | कोल्हापूर : मुलगी नको म्हणून नातीचा खून, आजीला कोठडी

कोल्हापूर : मुलगी नको म्हणून नातीचा खून, आजीला कोठडी

ठळक मुद्देपाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.दूधपावडर आणि औषधे आणण्याचा खर्च पेलवत नसल्याच्या रागातून

कोल्हापूर : आजारपणाचे निमित्त पुढे करून मुलगी नको होती, या कारणातूनच नातीचा गळा आवळून खून केल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आजी मोहबतबी आदम मुल्ला (वय ४५, रा. यादवनगर) हिला न्यायालयात हजर केले असता, जिल्हा व सत्र न्यायाधीश सोनाली एस. राऊळ यांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तिने नात शिफाना शब्बीर मुल्ला (वय ३ महिने) हिचा गळा आवळून खून केला होता.

सुनेला व आजारी तीन महिन्यांच्या नातीला बाहेरून दूधपावडर आणि औषधे आणण्याचा खर्च पेलवत नसल्याच्या रागातून नातीचा गळा आवळून खून केल्याची कबुली संशयित मोहबतबी मुल्ला हिने पोलिसांना दिली होती. पोलिसांनी तपास केला असता, तिला मुलगा हवा होता; परंतु मुलगी झाल्यापासून ती सून शहनाज हिचा छळ करीत होती. मुलगा शब्बीर याचे दुसरे लग्न करण्याची धमकी तिने दिली होती. अनेकवेळा तिने आम्हाला मुलगा हवा होता, असे बोलून दाखविले होते. आजारपणाच्या नावाखाली तिने अखेर नातीचा गळा घोटल्याचे तपासात पुढे आले.

 

Web Title: Kolhapur: The murder of the girl for not wanting the girl, the grandfather koli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून