शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पूरक्षेत्रातील चार रुग्णालयांना कोल्हापूर पालिकेची नोटीस, ७८ नागरिकांचे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 17:55 IST

संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना इतरत्र हलविण्याची सूचना

कोल्हापूर : पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली असून, यापुढे ती आणखी वाढण्याची शक्यता असल्याने महानगरपालिका प्रशासनाने प्रभावी उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. पूरक्षेत्रात असलेल्या चार रुग्णालयांना सोमवारी रात्री उशिरा पालिकेच्या उपायुक्तांनी नोटीस पाठवून त्यांना नवीन रुग्णांची भरती करून घेऊ नये, तसेच सध्या रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना अन्यत्र हलविण्यात यावे, असे कळविले आहे.नोटीस पोहोचल्यानंतर योग्य ती कार्यवाही केली नाही तर मात्र संबंधित रुग्णालयांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार कारवाई करण्याचा इशाराही नोटीसमध्ये देण्यात आला आहे.सन २०१९ व २०२१ च्या महापुरावेळी पूर क्षेत्रात असलेल्या रुग्णालय प्रशासनाची, तसेच महापालिका प्रशासनाची खूप तारांबळ उडाली होती. महापुराचे पाणी जसे रुग्णालयात शिरायला लागले तसे रुग्णालयातील, तसेच अतिदक्षता विभागातील रुग्ण इतरत्र हलविताना नाकी दम आला होता. त्यावेळी रुग्णांचेही चांगलेच हाल झाले. महापूर येणार आहे हे समजल्यानंतरही रुग्णालय प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली नव्हती.असा प्रसंग यापुढील काळात घडू नये म्हणून पालिका प्रशासनाने खबरदारी घेत सोमवारी ही नोटीस बजावली. अंतरंग, विन्स, डायमंड आणि ॲपल सरस्वती या चार रुग्णालयांचा नोटीस दिलेल्यांमध्ये समावेश आहे. पंचगंगा नदीने ३९ फूट ही इशारा पातळी गाठली आहे. त्यामुळे आपल्या रुग्णालयात नवीन रुग्ण दाखल करून घेऊ नयेत, सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांना इतरत्र उपचारासाठी दाखल करावे, पूरपातळी कमी होईपर्यंत रुग्णालयात सुरू राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.जर नोटीस दिल्याप्रमाणे कार्यवाही केली नाही तर सर्वस्वी जबाबदार धरून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार कारवाई करण्यात येईल, असे उपायुक्तांनी म्हटले आहे. चारही रुग्णालयांना या नोटीस सोमवारी रात्री उशिरा देण्यात आल्या.शहरातील ७८ नागरिकांचे स्थलांतरपंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी इशारा पातळीवर गेली असल्याने शहरातील नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तावडे हॉटेल परिसरातील वीटभट्टीजवळील ५८ व सुतारवाडा येथील २० नागरिकांना रविवारी व सोमवारी सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले.चहा, नाश्ता, जेवणाची सोयशहरातील पुराचे पाणी आलेल्या तावडे हॉटेल परिसरातील वीटभट्टीजवळील ५८ व सुतारवाडा येथील २० नागरिकांचे सुरक्षेच्या कारणास्तव स्थलांतर करण्यात आले. वीटपट्टी येथील नागरिकांचे मार्केटयार्ड येथील एका हॉलमध्ये, तर सुतारवाडा येथील नागरिकांचे दसरा चौकातील चित्रदुर्ग मठात स्थलांतर करण्यात आले आहे. या सर्वांना दोनवेळचे जेवण, दोनवेळचा चहा व एक वेळचा नाश्ता देण्याची व्यवस्था महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसfloodपूर