शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या महानगरपालिका सभेत थेट तिरडी मोर्चा, सत्तारुढ-विरोधी गटातील वादामुळे गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 15:20 IST

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा अपुरी पडू लागल्याच्या प्रश्नावरुन सत्तारुढ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी भागातील कार्यकर्त्यांसह थेट महानगरपालिकेच्या सभेत तिरडी मोर्चा आणल्याने बुधवारी गदारोळ उडाला. या सभेत विरोधी भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी सत्तारुढ नगरसेवकांवर टीका करताच विरोधकांवरही टीका झाल्यामुळे सभेतच गदारोळ उडाला.शहराची वाढणारी लोकसंख्या व त्या प्रमाणात मृतदेहांवर ...

ठळक मुद्देपंचगंगा स्मशानभूमीच्या प्रश्नावरुन राष्ट्रवादीचे आंदोलनथेट महापालिकेतील सभेतच तिरडी मोर्चा काढून आंदोलनपालकमंत्रीच निधी पुरवित नसल्याचा आरोप

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा अपुरी पडू लागल्याच्या प्रश्नावरुन सत्तारुढ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी भागातील कार्यकर्त्यांसह थेट महानगरपालिकेच्या सभेत तिरडी मोर्चा आणल्याने बुधवारी गदारोळ उडाला. या सभेत विरोधी भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी सत्तारुढ नगरसेवकांवर टीका करताच विरोधकांवरही टीका झाल्यामुळे सभेतच गदारोळ उडाला.

शहराची वाढणारी लोकसंख्या व त्या प्रमाणात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पंचगंगा स्मशानभूमीत जागा अपुरी पडू लागली आहे. काही लोकप्रतिनिधींनी स्मशानभूमी विस्तारीकरणासाठी निधी व परिसरातील जागा देण्याच्या घोषणा केल्या आहेत; पण फक्त ‘वरकमाई’मागे धावाधाव करणाऱ्या बेजबाबदार अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींच्या घोषणांचा पाठपुरावा केला नाही. परिणामी, विस्तारीकरणाअभावी अनेक मृतदेह स्मशानभूमीत पोहोचूनही त्यांच्यावर अंत्यसंस्कारासाठी दहन बेड शिल्लक नसल्याने नातेवाईकांना ताटकळत बसावे लागत आहे. यामुळे गेल्या रविवारी स्मशानभूमीत रक्षाविसर्जनसाठी सर्व दहन बेड फुल्ल असल्यामुळे दोन मृतदेह घेऊन आलेल्या नातेवाईकांना अक्षरश: दोन तास रस्त्यावर मृतदेह ठेवून बेड रिकामे होण्याची प्रतीक्षा करावी लागली.या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आणि त्यांच्या प्रभागातील कार्यकर्ते बुधवारी आक्रमक झाले. नगरसेवक अफजल पिरजादे, सुनील पाटील, सचिन पाटील, मुरलीधर जाधव, अजिंक्य चव्हाण, संदीप कवाळे यांनी थेट महापालिकेतील सभेतच तिरडी मोर्चा काढून आंदोलन केले.दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सभेत तिरडी आणताच गदारोळी माजला. विरोधी भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी सत्ता असताना नगरसेवक आंदोलन कसे करतात, त्यांनी निधी मंजूर करुन आणायला पाहिजे होता, अशी टीका करताच सत्तारुढ आघाडीच्या नगरसेवकांनीही पालकमंत्रीच निधी पुरवित नसल्याचा आरोप करत गोंधळ घातला. तुमच्या पक्षाचेच पालकमंत्री आहेत, त्यांनी महानगरपालिकेला देणारा निधी आखडता घेतल्याचा आरोप या नगरसेवकांनी करताच पुन्हा गोंधळ माजला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका