सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:27 AM2017-11-28T00:27:13+5:302017-11-28T00:29:07+5:30

‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत शिवसेना-भाजपा युतीने सत्ता मिळवली, मात्र तीन वर्षे झाली तरी सरकारने आश्वासने न पाळता फसव्या घोषणा करत खोट्या जाहिरातीचा सपाटा लावला आहे. जनता आता त्यांच्या खोटारडेपणाला कंटाळली असून, सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादीने रस्त्यावर उतरत हल्लाबोल आंदोलन पुकारले आहे. जनता आता या सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहाणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोमवारी दिंडोरी येथे केले.

NCP's attackball movement to wake up the government | सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन

सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन

Next
ठळक मुद्देतीन वर्षे झाली तरी आश्वासने न पाळता फसव्या घोषणा सरकार सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली दिंडोरी तहसील कार्यालयावर मोर्चा

दिंडोरी : ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत शिवसेना-भाजपा युतीने सत्ता मिळवली, मात्र तीन वर्षे झाली तरी सरकारने आश्वासने न पाळता फसव्या घोषणा करत खोट्या जाहिरातीचा सपाटा लावला आहे. जनता आता त्यांच्या खोटारडेपणाला कंटाळली असून, सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादीने रस्त्यावर उतरत हल्लाबोल आंदोलन पुकारले आहे. जनता आता या सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहाणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोमवारी दिंडोरी येथे केले.  गेल्या तीन वर्षांपासून सत्तेवर असलेले भाजपा-शिवसेना युती सरकार सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे. अनेक पोकळ आश्वासने देऊन युती सरकारने जनतेची फसवणूक केलेली आहे. सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादीने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली दिंडोरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. त्यावेळी तटकरे बोलत होते. दुपारी साडेबाराच्या दरम्यान दिंडोरी-नाशिक-कळवण रस्त्यावरील येथील वृंदावन गार्डन येथून भव्य हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व तटकरे यांनी केले. मोर्चात कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, आमदार नरहरी झिरवाळ, आमदार जयंत जाधव, दीपिका चव्हाण, जयंत जाधव, माजी आमदार दिलीप बनकर, संजय चव्हाण, माजी खासदार देवीदास पिंगळे, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, कृउबा सभापती दत्तात्रेय पाटील, महिला आघाडी अध्यक्ष प्रेरणा बलकवडे, भारती पवार, रंजन ठाकरे, प्रकाश वडजे, गजानन शेलार, बाळासाहेब जाधव, भास्कर भगरे, राजेंद्र उफाडे, अविनाश जाधव, सचिन देशमुख, डॉ. योगेश गोसावी, श्याम हिरे, गंगाधर निखाडे, कैलास मवाळ आदींसह हजारो कार्यकर्ते सुमारे चार किलोमीटर पायी मोर्चात सहभागी झाले. मोर्चात काही शेतकरी बैलगाडीसह सहभागी झाले होते. ढोलताशांच्या गजरात सरकार विरोधात घोषणा देत एक तासाने हल्लाबोल मोर्चा दिंडोरी तहसील कार्यालयावर धडकला. तेथे सभा होत सर्वच नेत्यांनी आपल्या भाषणात शिवसेना-भाजपा युतीच्या सरकारच्या कारभारावर हल्लाबोल केला. यावेळी बोलताना तटकरे यांनी राज्य व केंद्रातील शिवसेना-भाजपा युतीच्या कारभारावर जोरदार टीका केली. गेल्या तीन वर्षांपासून सत्तेवर असलेले भाजपा-शिवसेना युती सरकार सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे. अनेक पोकळ आश्वासने देऊन युती सरकारने जनतेची फसवणूक केलेली आहे. शेतकरी, शेतमजूर, कामगार, लहान व्यावसायिक, शिक्षक, डॉक्टरांसह सर्वच क्षेत्रांमध्ये युती सरकारबद्दल तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. नोटबंदीसारख्या निर्णयामुळे देशाची व राज्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे. शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. शेती व शेतकºयांचे प्रश्न, विजेच्या समस्या, महागाई, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, रस्त्यांच्या समस्या, उद्योग, रोजगारात झालेली घसरण, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न, ढासळलेली शिक्षण व्यवस्था, आरोग्याच्या समस्या, कुपोषण यासारख्या विविध समस्यांवर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यात येऊन जनतेच्या समस्या न सुटल्यास राष्ट्रवादी अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. सरकारच्या कारभाराचा पंचनामा करण्यासाठी ग्रामीण भागासह शहरी भागातही राष्ट्रवादी आंदोलन करणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विविध मागण्यांचे तहसीलदार बाबासाहेब गाढवे यांना निवेदन दिले. यावेळी पोलीस उपअधीक्षक देवीदास पाटील, पाटील आदींनी चोख बंदोबस्त ठेवला. मोर्चा रस्त्याचे एक बाजूने सुरू असल्याने वाहतूक संथगतीने सुरू होती. 
१२ डिसेंबरला विधानभवनावर हल्लाबोल 
सरकारने ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत सत्ता मिळविलेल्या शिवसेना-भाजपा युतीच्या सरकारने जनतेची फसवणूक केली असून, या सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नागपूर अधिवेशनावर हल्लाबोल मोर्चा नेण्यात येणार असल्याचे आमदार सुनील तटकरे यांनी सांगितले. 
सुनील तटकरे म्हणाले.....
नार-पार योजना आमच्या सरकारच्या काळात महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी आखली; परंतु गुजरातच्या नेत्यांच्या इशाºयावर खाली माना घालत भाजपाचे नेते महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला देण्याचे पाप करत आहेत. त्याच्याविरु द्ध हल्लाबोल करण्याशिवाय पर्याय नाही. 
सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून, मुख्यमंत्री रोज कर्जमाफीबाबत चुकीचे आकडे देत फसवणूक करत असून, उपस्थितांमध्ये कुणाला तरी कर्जमाफी मिळाली का, असा सवाल करत जर कुणाला मिळाली असेल तर त्यांचा मी लाभार्थी म्हणून फोटो लावू. 
शेतकºयांबाबत हे सरकार उदासीन असून, एवढे शेतकरी आत्महत्या करत असताना सांत्वन करण्यासाठी सरकारचे मंत्री जात नाही ही शोकांतिका आहे. 
राज्यातील रस्ते खड्ड्यात
आमदार नरहरी झिरवाळ यांनी आपल्या भाषणात सरकारच्या कारभारावर हल्लाबोल करत गेल्या दोन तीन वर्षात रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी निधी न दिल्याने साºया राज्यातील रस्ते खड्ड्यात गेले असून, या सरकारला जनता कंटाळली असल्याचे सांगितले.
४सर्वच विकासाच्या योजनांना सरकारने कात्री लावली असून, खोट्या जाहिरातीचा सपाटा लावला असून, आदिवासी विभागाच्या योजनांना निधी कपात करत रेशनवरील धान्यही कमी केले असल्याचे सांगितले़

Web Title: NCP's attackball movement to wake up the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.