शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर महापालिकेची चार सदस्यीय प्रभागरचना तयार; जिल्हाधिकाऱ्यांकडे गुरुवारी सादर करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 12:02 IST

लोकसंख्या निकषानुसार वीस प्रभाग

कोल्हापूर : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार करण्यात येत असलेल्या प्रभागरचनेचे काम आता अंतिम टप्प्यावर पोहोचले आहे. त्यामुळे प्रशासकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सर्वाधिक वेळ या कामात जात आहे गुरुवारी ही प्रभागरचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केली जाणार आहे.राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सर्वप्रथम प्रभागरचनेचे काम केले जात आहे. लोकसंख्या निकषानुसार वीस प्रभाग तयार केले जात आहेत. त्यापैकी १९ प्रभाग हे चार सदस्यीय, तर एक प्रभाग हा पाच सदस्यांचा असणार आहे. यावेळच्या निवडणुकीत नागरिकांना एकूण ८१ नगरसेवक निवडून द्यायचे आहेत.गेले महिनाभर प्रभागरचनेचा काम सुरू आहे. आता हे काम अंतिम टप्प्यावर आले आहे. प्रत्येक प्रभागाची हद्द त्या त्या ठिकाणी जाऊन तपासण्यात आली. प्रभाग तयार करत असताना रस्ते, कॉलनी याची भौगोलिक सलगता राखताना अधिकाऱ्यांना बरीच मेहनत घ्यावी लागली. त्यासाठी गल्ली, कॉलनी, वसाहती यांची जागेवर जाऊन माहिती घ्यावी लागली आहे.प्रभागरचना पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी ती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने त्यास मान्यता दिल्यावर ती नागरिकांना पाहण्यासाठी खुली केली जाईल. त्यानंतर त्यावर हरकती मागविल्या जाणार आहेत. हरकतींची शहानिशा केल्यानंतर ती अंतिम केली जाणार आहे.

२० प्रभागातून ८१ नगरसेवक निवडून येतील. त्यातील ११ जागा अनुसूचित जाती जमातीसाठी २१ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी आरक्षित राहणार आहेत, उरलेल्या ४९ जागा या खुल्या प्रवर्गासाठी असतील. ८१ नगरसेवकांपैकी ४१ पुरुष नगरसेवक, तर ४० महिला नगरसेवक होतील.