कोल्हापूर महापालिका दोन सिंगल बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:18 IST2021-04-29T04:18:53+5:302021-04-29T04:18:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शहरातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका, केएमटी आणि पोलीस यांच्यातर्फे प्रयत्न केले जात असून, कोरोनासंबंधीचे ...

Kolhapur Municipal Corporation Two Single News | कोल्हापूर महापालिका दोन सिंगल बातम्या

कोल्हापूर महापालिका दोन सिंगल बातम्या

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : शहरातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका, केएमटी आणि पोलीस यांच्यातर्फे प्रयत्न केले जात असून, कोरोनासंबंधीचे नियम तोडणाऱ्यांवर या पथकांकडून कारवाई केली जात आहे. बुधवारी नियम तोडणाऱ्या १४७ नागरिकांना दंड करून त्यांच्याकडून ७६ हजार रुपयांचा दंड वसूल केला.

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सर्वांनी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे, हातमोजे वापरणे या प्रतिबंधक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तरीही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात. म्हणून हा दंड करण्यात आला.

.....................

सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी

कोल्हापूर : शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महापालिकेद्वारे शहरामध्ये भाजी मार्केट, मुख्य चौक व वर्दळीच्या ठिकाणी सोडिअम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात येत आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने चार ट्रॅक्टरद्वारे औषध फवारणी करण्यात येत असून बुधवारी रेल्वे स्टेशन परिसर, गोविंद पार्क, साईक्स एक्स्टेन्शन, कमला कॉलेज परिसर, राजे संभाजी कॉलनी, माने गल्ली, सासने गल्ली, रंकाळा रोड, ताराबाई रोड, चंद्रेश्वर गल्ली, संध्यामठ गल्ली, राजारामपुरी, शाहूपुरी, मस्कुती तलाव, जोशी गल्ली, रेगे तिकटी, यादवनगर, टेंबलाईवाडी, साईनाथ कॉलनी, लक्ष्मी कॉलनी, बालाजी पार्क, नंदनवन कॉलनी, दत्तभागीरथी कॉलनी, सुर्वेनगर, नाना पाटीलनगर, जीवबा नाना पार्क, रमणमळा, लाईन बझार, कसबा बावडा, राजोपाध्येनगर, मनोरमानगर, तुळजाभवानी कॉलनी, पंचगंगा हॉस्पिटल, पद्माराजे शाळा, खोलखंडोबा परिसर, म्हाडा कॉलनी या ठिकाणी औषधाची फवारणी करण्यात आली.

Web Title: Kolhapur Municipal Corporation Two Single News