शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

कोल्हापूर महापालिकेचा ऑक्सिजन प्लांट वापराविना पडून, तीन वर्षांपासून बंद असल्याने खराब होण्याची शक्यता

By भारत चव्हाण | Updated: December 16, 2024 15:22 IST

३० लाखांचा बुस्टर पंप बसविला तर मनपासह खासगी रुग्णालयांची होणार सोय

भारत चव्हाण कोल्हापूर : ‘गरज सरो अन् वैद्य मरो’ अशी मराठीत एक म्हण प्रचलित आहे. या म्हणीचा प्रत्यय आणणारी घटना महानगरपालिका प्रशासनाकडून घडली आहे. चार वर्षांपूर्वी कोरोना महामारीच्या काळात शेकडो नागरिकांचे प्राण वाचविणारा ऑक्सिजन जनरेटर प्लांट सध्या वापराविना पडून आहे. गेल्या तीन वर्षांपासून हा प्लांट बंद स्थितीत असल्याने तो खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सन २०२० च्या एप्रिल महिन्यात कोल्हापूर शहर परिसरात कोरोना महामारीचे रुग्ण सापडायला लागले. रुग्णांची संख्या वाढायला लागली, रुग्णालयात रुग्णांसाठी बेड मिळणे मुश्किल झाले. तेव्हा कोविड सेंटर सुरू करण्यात आली. परंतु, रुग्णालयातील अत्यवस्थ रुग्णांना व्हेंटिलेटर व ऑक्सिजनचा मोठा तुटवडा भासायला लागला. अनेक रुग्ण व्हेंटिलेटर न मिळाल्याने प्राणास मुकले. त्यावेळी प्रशासनही हतबल झाले.जिल्ह्यात सर्वांत जास्त रुग्ण सीपीआर आणि महानगरपालिका प्रशासनाने तयार केलेल्या कोविड सेंटरकडे भरती होत होते. त्यामुळे व्हेंटिलेटसह रुग्णांना लागणारा ऑक्सिजन उभा करणे एक आव्हान होते. तेव्हा सीपीआर प्रशासनाने रुग्णालय आवारात, तर महापालिका प्रशासनाने आयसोलेशन रुग्णालय परिसरात तातडीने ऑक्सिजन प्लांट उभारला. या ऑक्सिजनअभावी तडफडणाऱ्या शेकडो रुग्णांना जीवदान दिले.ऑक्सिजन जनरेटर प्लांटचा उपयुक्त वापर झाल्यानंतर कोरोना संपताच पुढे दोन वर्षांतच आयसोलेशन रुग्णालय आवारात उभारण्यात आलेल्या या प्लांटकडे दुर्लक्ष झाले. आज त्याचा वापर शून्य झाला आहे. वापराविना पडून आहेत. हा प्लांट उभारण्यासाठी ८० लाख २५ हजार रुपये खर्च झाले होते. जिल्हा नियोजन समितीने हा निधी उपलब्ध करून दिला. आता त्याच्या वापराविना हा प्लांट अक्षरश: गंजून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

बूस्टर पंपाचा ३० लाखांचा खर्चहा ऑक्सिजन जनरेटर प्लांट सुरू ठेवून त्यांच्यापासून ऑक्सिजन निर्मिती करून तो शहर परिसरातील खासगी रुग्णालयांना पुरवठा करण्याचा प्रस्ताव महापालिका आरोग्याधिकारी कार्यालयाकडून समोर आणला आहे. त्याकरिता ३० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. परंतु, वापरात नसलेल्या ऑक्सिजन प्लांटवर इतका खर्च करण्यास प्रशासनाने नकार दिला आहे. त्यामुळे हा निधी जिल्हा नियोजन समितीकडून मागण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला. परंतु, तिकडूनही फारसा प्रतिसाद दिला गेला नाही. बूस्टर पंप नसल्याने हा प्लांट बंद पडला आहे.महापालिकेचा आठ लाखांचा खर्चमहापालिकेच्या रुग्णालयात रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिजनवर वर्षाला सात ते आठ लाख रुपये खर्च करावा लागत आहे. त्यामुळे बूस्टर पंप खरेदी करून तो केवळ महापालिकेसाठी जरी वापरला तरी चार वर्षांनंतर हा खर्च करावा लागणार नाही आणि ऑक्सिजन विकला तर त्यापासून पैसे तर मिळतील शिवाय खासगी रुग्णालयातील रुग्णांची सोय होईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयcorona virusकोरोना वायरस बातम्याOxygen Cylinderऑक्सिजन