कोल्हापूर : महापालिकेतील ८५ लाखांचे बिल घेण्याच्या प्रक्रियेतील कागदपत्रांवर संबंधित सर्व अधिकाऱ्यांनीच सह्या केल्या असल्याचा दावा ठेकेदार श्रीप्रसाद संजय वराळे यांनी केला. या कामाची मोजमाप पुस्तक कनिष्ट अभियंता प्रज्ञा गायकवाड यांनीच तयार केले आहे. त्यातील एकही कागदपत्र खोटा नाही.
कामाची ९३ लाख रक्कम अजून महापालिकेमध्ये शिल्लक आहे तरीही माझ्यावर खोटा आरोप केला जात आहे. कोणा दुसऱ्या ठेकेदार व अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी माझा बळी दिला जात असल्याचे वराळे यांनी सांगितले. मी सर्व चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे परंतु माझ्यासोबत सर्व अधिकाऱ्यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
वाचा- हा घ्या स्क्रीन शॉट; कोल्हापूर महापालिकेतील अधिकाऱ्यांना टक्केवारीनुसार रोख रकमा दिल्या, ठेकेदाराचा आरोप ड्रेनेजलाईन टाकण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. मी या कामातील ३५ लाखांच्या पाईप टाकल्या आहेत. चौकशी करण्यास कोणी आले तर ते काम जागेवर खुदाई करून दाखविण्याची माझी तयारी आहे, असे वराळे यांनी सांगितले. कामाची ९३ लाख रक्कम अजून महापालिकेमध्ये शिल्लक आहे. तरीही माझ्यावरती हा आरोप केला जात असल्याचे वराळे यांनी पत्रात म्हटले आहे.कॅफे हाऊसमध्ये लिहून घेतले पत्रजेव्हा ८५ लाखांचे बिल उचलल्याचा माझ्यावर आरोप झाला तेव्हा घाबरलेल्या अधिकाऱ्यांनी मला या प्रकरणातून तुम्हाला बाहेर काढतो, एफआयआर दाखल करणार नाही, असा ‘शब्द’ मला दिला. मला राजारामपुरी येथील कॅफेमध्ये अधिकाऱ्यांनी बोलावून घेतले आणि तेथे माझ्याकडून बोगस बिल उचलल्याचे पत्र लिहून घेतले. त्यामुळे मी लागलीच उत्तर दिले नाही. आम्ही त्या कॅफेमध्ये जमलो होतो की नाही हे तेथील सीसीटीव्ही फुटेजवरून समोर येईल. आता माझ्यावर गुन्हा दाखल होणारच आहे तर सत्य बाहेर येऊ दे म्हणून मी हे स्पष्टीकरण करत असल्याचे वराळे यांनी सांगितले.
कारवाई थांबविण्यासाठी अडीच लाख..तत्कालीन शहर अभियंत्यांनी यांनी एका कामात तक्रार झाल्यावर तुझे रजिस्ट्रेशन ब्लॅकलिस्ट करत नाही यासाठी माझ्याकडून कावळा नाका येथील पोलिस चौकीच्या थोड्या पुढे अंतरावर मे २०२४ मध्ये दुपारी बारा ते दोनच्या दरम्यान अडीच लाख रुपये रोख रकमेमध्ये घेतले होते व माझ्यावरील मी न केलेल्या गुन्ह्याचे कारवाई थांबविली होती, असे लेखी पत्रात म्हटले आहे.
आतापर्यंत ६० लाख दिलेमहापालिकेत मी २०१३ पासून कामे करतो. आजपर्यंत सात ते आठ कोटी रुपयांच्या कामाची बिले घेण्यासाठी ६० ते ६५ लाख रुपये बिलाच्या टक्केवारीच्या स्वरूपात दिल्याचा आरोप या पत्रात केला आहे.
ठेकेदार बबन पवार यांच्या कामाचीही चौकशी कराठेकेदार बबन पवार यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून बऱ्याच ठिकाणी ॲडव्हान्समध्ये काम केली आहेत त्याची गुणवत्ता ही तपासावी. निविदाच्याआधी त्यांनी कसे काम केले हे तपासावे, असे आव्हानही वराळे यांनी या पत्रात दिले आहे.