शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

गृहमंत्री अमित शहांसाठी कोल्हापूर महापालिका बनवतंय खास शिडी; का अन् कशासाठी...वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 14:20 IST

शहा यांची उंची, त्यांची चालण्याची व पाय टाकण्याची पद्धत लक्षात घेऊन तशा पद्धतीने डिझाइन तयार

कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या रविवारी (१९ फेब्रुवारी) कोल्हापुरात येत असून, या दौऱ्यात ते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणार आहेत. हा अभिवादन सोहळा सहज शक्य व्हावा म्हणून त्यांच्यासाठी खास शिडी बनविण्यात येत आहे. शहा यांची उंची, त्यांची चालण्याची व पाय टाकण्याची पद्धत लक्षात घेऊन तशा पद्धतीने डिझाइन तयार करण्यात आले आहे.केंद्रीय मंत्री शहा यांचा कोल्हापूर दौरा निश्चित झाला आहे. येत्या रविवारी ते कोल्हापुरात येणार असून, विविध कार्यक्रमांत सहभागी होत आहेत. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अमित शहा अभिवादन करणार आहेत. दसरा चौकातील शाहूंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्याकरिता एक कायमस्वरूपी शिडी महानगरपालिका प्रशासनाने तयार केली आहे. ती मुस्लिम बोर्डिंगच्या मैदानावर ठेवलेली असते.परंतु, ही शिडी जुनी झाली असून, गृहमंत्री शहा यांना अभिवादन करण्याकरिता वर जाणे त्रासाचे ठरणार आहे. याबाबतची माहिती सुरक्षा यंत्रणांनी जिल्हा प्रशासनाला कळविली होती. त्यानुसार महानगरपालिका प्रशासनाने त्याची दखल घेऊन नवीन शिडी तयार करण्याचा निर्णय घेतला. सर्वसाधारण शिडीच्या किंवा जिन्याच्या पायऱ्या एक फूट उंच व नऊ इंच रुंद असतात. परंतु, ती शहा यांच्यासाठी सोयीची ठरणारी नाही.म्हणूनच शहा यांच्या चालण्याची व पाय टाकण्याची पद्धत विचारात घेऊन शिडीचे डिझाइन तयार करण्यात आले आहे. स्ट्रक्चरल डिझायनर प्रशांत हडकर यांनी त्याचे डिझाइन बनवले आहे. नवीन शिडी पंधरा फूट उंचीची असणार आहे. त्याला दोन वळणे ठेवली आहेत. त्याच्या पायऱ्या सहा इंच उंच, एक फूट रुंद व चार फूट लांबीच्या ठेवण्यात आल्या आहेत. शिडी तयार झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तिची स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी तपासली जाणार आहे. शिडीला येणाऱ्या खर्चाची जबाबदारी महापालिकेने उचलली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAmit Shahअमित शाह