कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी दि. १६ जानेवारी रोजी होणार असून सकाळी दहा वाजता ही मतमोजणी सुरू होईल. प्रत्येक प्रभागाची मतमोजणी तीन फेऱ्यांत होणार आहे. त्यामुळे दोन तासांत सर्व निकाल जाहीर होतील, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी पत्रकारांना दिली.मतदान झाल्यानंतर सर्व मतदान यंत्रे मतमोजणीच्या ठिकाणी नेऊन तेथील स्ट्राँग रूमध्ये ठेवण्यात येतील. दुसऱ्या दिवशी म्हणजेच दि. १६ जानेवारीला सकाळी १० वाजता मतमोजणीकरिता मतदान यंत्रे बाहेर काढण्यात येणार आहेत. मतमोजणीला होणारी गर्दी विचारात घेता चार ठिकाणी ही मतमोजणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गांधी मैदान, दुधाळी, व्ही. टी. पाटील सभागृह व शासकीय गोदाम रमणमळा येथे ही मतमोजणी होईल.
वाचा: थेट पाइपलाइनमध्ये दोष होता तर आठ वर्षात चौकशीला हात कुणी धरला होता, सतेज पाटील यांचे प्रत्युत्तर प्रत्येक मतमोजणी केंद्रात १२ टेबलांची व्यवस्था करण्यात येणार आहे; परंतु त्यापैकी दहा टेबलांवर एकाच वेळी एका प्रभागाची मतमोजणी केली जाणार आहे. एका प्रभागातील चार जागांचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुढच्या प्रभागाची मतमोजणी सुरू केली जाईल. एका प्रभागाला साधारणपणे वीस मिनिटे मतमोजणीला लागतील. त्यामुळे दोन तासांत सर्व निकाल लागतील.
११३ वाहनांचे बुकिंगमतदानाच्या आदल्या दिवशी मतदान यंत्रासह सर्व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर पोहोचविण्याकरिता, तसेच मतदान झाल्यानंतर पुन्हा स्ट्राँग रूमपर्यंत आणण्याकरिता ६५ केएमटी बस, ४५ एस.टी. बस, तसेच तीन जीप अशी ११३ वाहने ताब्यात घेतली जाणार आहेत.
कुठे होणार मतमोजणी
- गांधी मैदान,
- दुधाळी,
- व्ही. टी. पाटील सभागृह
- शासकीय गोदाम रमणमळा
Web Summary : Kolhapur Municipal election counting on January 16th. Three rounds per ward; results expected in two hours. Counting at four locations with twelve tables each. 113 vehicles booked for transporting staff and machines.
Web Summary : कोल्हापुर नगर निगम चुनाव की मतगणना 16 जनवरी को। प्रत्येक वार्ड में तीन दौर; दो घंटे में परिणाम अपेक्षित। चार स्थानों पर मतगणना, प्रत्येक में बारह टेबल। कर्मचारियों और मशीनों के परिवहन के लिए 113 वाहन बुक।