शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

कोल्हापूर महापालिकेची निवडणूक आता थेट नोव्हेंबर महिन्यात ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2021 4:14 PM

Muncipal Corporation Elecation Kolhapur-कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक पुन्हा लांबणीवर पडली आहे. निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेची निवडणूक नोव्हेंबर महिन्यापर्यंत लांबण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर महापालिकेची निवडणूक आता थेट नोव्हेंबर महिन्यात ?निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य सरकार निर्णय

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक पुन्हा लांबणीवर पडली आहे. निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेची निवडणूक नोव्हेंबर महिन्यापर्यंत लांबण्याची शक्यता आहे.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लांबणीवर टाकण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. मार्चमधील संभाव्य निवडणूक आता नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. प्रशासक म्हणून कादंबरी बलकवडे यांच्याकडेच पालिकेचा कार्यभार राहणार आहे. त्यामुळे इच्छुकांचा दुसऱ्यांदा हिरमोड झाला आहे.कोल्हापूर महापालिकेमध्ये सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. आघाडीला शिवसेनेचीही साथ आहे. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे यंदाही कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत हे तिन्ही पक्ष एकत्र येतात का महत्त्वाचं ठरणार आहे.  गेल्यावेळी भाजपने स्थानिक ताराराणी आघाडीशी युती करून सत्तेच्या जवळपास यश मिळवलं. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेच्या चार सदस्यांना सोबत घेतल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीने सत्ता मिळवली.गेल्यावेळी भाजप सत्तेत होता त्याचा परिणाम महानगरपालिका निवडणुकीतील यशावर झाला. ताराराणी आघाडीचे प्रमुख महाडिक कुटुंबीय आता भाजपमध्ये आहेत. त्यामुळे ही निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवली जाणार की ताराराणी आघाडी आणि भाजप अशी युती होणार हे महत्त्वाचं आहे.  जिल्ह्यात दोन्ही खासदार शिवसेनेचे, मात्र ...कोल्हापूर जिल्ह्यात दोन खासदार आहेत. हे दोन्ही खासदार शिवसेनेचे आहेत. मात्र २०१९ च्या विधानसभा निकालात कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड उलटफेर पाहायला मिळाले. शिवसेनेने ६ पैकी ५ जागा गमावल्या. तर कोल्हापूर जिल्हा भाजपमुक्त झाला.पक्षीय बलाबल

  • काँग्रेस- ३०
  • राष्ट्रवादी- १५
  • शिवसेना- ०४
  • ताराराणी आघाडी- १९
  • भाजप- १३
  • एकूण जागा -८१
टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर