शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

कोल्हापूरच्या आयुक्त नियुक्तीचे तीन-तेरा; पालकमंत्री ठरले खोटे, ‘अडचण’ कुणाची आणि कसली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 17:34 IST

एका संघटनेने थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना साकडे घातले

कोल्हापूर : जी गोष्ट आपल्या हातात नाही त्याबद्दलही नेतेमंडळी किती ठामपणे बोलतात आणि उघडी पडतात याचे उत्तम उदाहरण म्हणून कोल्हापूरच्या आयुक्त नियुक्तीकडे पाहावे लागेल. पालकमंत्री दीपक केसरकर हे तीन दिवसांत कोल्हापूरला आयुक्त देणार होते. या आश्वासनाला तेरा दिवस उलटून गेले तरीही आयुक्त मिळालेच नाहीत. केसरकर खोटे आश्वासन देऊन कोल्हापूरला का फसवत आहेत, अशी विचारणा होऊ लागली आहे.कादंबरी बलकवडे यांची बदली होऊन दोन महिने होऊन गेले तरी अजूनही आयुक्त नियुक्ती झालेली नाही. २४ जुलैला पालकमंत्री केसरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी तीन दिवसांत आयुक्त हजर होतील, असे सांगून टाकले. या गोष्टीला आता तेरा दिवस उलटून गेले तरीही आयुक्तांची नियुक्ती झालेली नाही. मधल्या काळात दोनवेळा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या; परंतु त्यातही कोल्हापूरला वंचित ठेवण्यात आले. मग पालकमंत्र्यांनी तीन दिवसांची मुदत कोणाच्या जिवावर दिली, अशी विचारणा होऊ लागली आहे.महापालिका निवडणूक तोंडावर आहे. त्यामुळे आपापल्या सोयीचा अधिकारी या ठिकाणी आणण्यासाठी भाजप, शिंदे गटात रस्सीखेच असल्याचे सांगितले जाते. तुमच्यातील रस्सीखेचीशी जनतेला देणे-घेणे नाही. त्यांना झटक्यात निर्णय घेऊन शहरवासीयांचे प्रश्न सोडवणारा धडाडीचा अधिकारी हवा आहे; परंतु मुंबईचे असो किंवा स्थानिक नेते असो हे जर ‘आमचे समाधान करणारा अधिकारी पाहिजे’ यासाठी हा विलंब करत असतील तर ते धोकादायक आहे.

‘अडचण’ कुणाची आणि कसली?राज्यात सध्या महायुती सत्तेत आहेत. एकाएकापेक्षा तीन-तीन धडाडीचे नेते सरकार चालवत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे निर्णय फटाफट होतात, असेही सांगितले जाते. मग कोल्हापूरच्या आयुक्तपदासाठी अधिकारी देताना नेमकी कुणाला आणि कसली अडचण आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

केंद्रीय गृहमंत्र्यांनाच साकडेवेगळ्या प्रकारच्या आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापुरातील एका संघटनेने थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना साकडे घातले आहे. तुम्ही कोल्हापूरचे जावई असताना आणि तुमच्या पक्षाचे सरकार राज्यात सत्तेत असताना आयुक्त का मिळत नाही, अशी विचारणा मेलद्वारे शहा यांना केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeepak Kesarkarदीपक केसरकर