शहरं
Join us  
Trending Stories
1
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा
2
भविष्यवाणी खरी ठरणार? जगन्नाथ मंदिराच्या कळसावर पक्ष्यांचे थवे, 'भविष्य मालिका' ग्रंथात उल्लेख...
3
भल्या भल्यांना नाही जमले ते आज एलन मस्कनी करून दाखविले; ६०० अब्ज डॉलर संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनले
4
"१०० वेळा विचार करेल, आत्मा थरथरेल..."; पहलगाम हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची मागणी
5
व्होडाफोनने सर्वांवर कडी केली! फोन हरवला, चोरी झाला... रिचार्जसोबतच २५००० चा विमा, ते ही ६१ रुपयांत...
6
ट्रम्प टॅरिफची हवा निघाली, भारताकडून अमेरिकेची जोरदार खरेदी; चीनही टॉप ३ मध्ये, पाहा अधिक माहिती
7
२०२६ मध्ये भारतीय बाजारात 'धमाका' करण्याच्या तयारीत किआ! घेऊन येतेय ३ ढासू मॉडेल, EV चाही समावेश
8
'धुरंधर'मधला 'तो' सीन अन् सौम्या टंडनने अक्षय खन्नाच्या तब्बल ७ वेळा कानाखाली मारली, म्हणाली- "खूप वाईट..."
9
२५ जणांच्या राखरांगोळीस जबाबदार असणारे लुथरा बंधू भारताच्या ताब्यात; थायलंडहून आज दुपारी आणले जाणार
10
१० वर्षांची प्रतीक्षा संपली, नेपाळला जाणाऱ्यांसाठी खूशखबर; आता बिनधास्त घेऊन जा २००, ५०० ची नोट
11
“पृथ्वीराज चव्हाण हे जगातील सर्वांत मोठे भविष्यवेत्ते आहेत”; भाजपा नेत्यांचा पलटवार
12
शेअर बाजारात कंपनी आधीच बॅन, आता चर्चेतील 'या' फिनफ्ल्युएन्सरवर SEBI ची मोठी कारवाई; प्रकरण काय?
13
Leopard Pune: 'बिबट्या दिसला तर पळू नका', पुण्यातील आयटी पार्कही दहशतीत! cognizant कंपनीने कर्मचाऱ्यांना काय सांगितलं?
14
"मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, मुंबई वाचवायला..."; संजय राऊतांचा भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा
15
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
16
Latur Crime: लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं कारमध्ये बसवलं, दारू पाजली, निर्जनस्थळी नेऊन जिवंत जाळलं! 
17
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
18
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
19
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
20
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर महापालिकेचे ३५ प्रभाग आरक्षित, ५७ प्रभाग खुले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 15:50 IST

सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला यांच्यासाठी ५७ जागा खुल्या

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास अशा प्रवर्गासाठी ३५ प्रभागांवर आरक्षण पडले, तर सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला यांच्यासाठी ५७ जागा खुल्या झाल्या आहेत. आरक्षणाची आदर्श पद्धत लक्षात घेता निवडणूक लढविण्याच्या बाबतीत फारसा कोणावर अन्याय होणार नाही. केवळ सर्वसाधारण प्रवर्गातून इच्छुकांची संख्या अधिक असल्याने काहींना आपल्या ‘होम मिनिस्टर’ना निवडणूक रिंगणात उतरविण्याची तडजोड करावी लागणार आहे.

महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारी येथील केशवराव भोसले नाट्यगृहात प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्या उपस्थितीत प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या आरक्षण सोडतीवेळी बहुतांश प्रभागांवर थेट आरक्षण टाकण्यात आले. केवळ १५ जागांसाठीच सोडत काढण्यात आली, तर यापूर्वी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १२, तर अनुसूचित जमातीसाठी एक जागेवर टाकण्यात आलेले आरक्षण कायम ठेवण्यात आले.

सकाळी अकरा वाजता आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सुरू झाला. उपायुक्त रविकांत आडसूळ यांनी आरक्षण सोडतीची सर्व प्रक्रिया समजावून सांगितली. यावेळी सभागृहात उपस्थित असणाऱ्या सर्वांना छापील माहिती पत्रकही वाटण्यात आले. सुमारे पाऊण तास आरक्षण प्रक्रियेची माहिती, क्रमांक असलेल्या चिठ्ठ्या दाखवून झाल्यानंतर प्रत्यक्ष आरक्षण सोडतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

अनुसूचित जाती, जमातीचे प्रभाग जाहीर

अनुसूचित जातीचे सहा, अनुसूचित जाती महिलांसाठीचे सहा, तर अनुसूचित जमाती एक अशा तेरा प्रभागांचे आरक्षण या आधीच निश्चित करण्यात आल्याचे उपायुक्त आडसुळ यांनी सुरुवातीला सांगितले. ज्या प्रभागात अनुसूचित जाती, जमातीची लोकसंख्या जास्त आहे, असे प्रभाग या प्रवर्गासाठी थेट आरक्षित करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या होत्या, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

ओबीसीसाठी १८ प्रभागांवर थेट आरक्षणनिवडणुकीसाठी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) २२ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यातील अकरा जागा याच प्रवर्गातील महिलांकरिता राखीव आहेत. आयोगाच्या सूचनेनुसार ओबीसीकरिता २२ पैकी १८ प्रभागांवर थेट आरक्षित टाकण्यात आले, तर चार जागांवरील आरक्षण सोडतीद्वारे निश्चित करण्यात आले. ओबीसी महिलांच्या वाटणीला आलेल्या अकरा जागांपैकी तीन जागांवर थेट आरक्षण टाकण्यात आले, तर आठ प्रभागांवरील आरक्षण सोडतीद्वारे काढण्यात आले.

सर्वसाधारण प्रवर्गातील २९ महिलांना संधी

सर्वसाधारण प्रवर्गातील २९ महिलांना महापालिकेत नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्गाचे आरक्षण वगळून एकही जागा आरक्षित राहिलेली नाही अशा प्रभागांवर सर्वसाधारण महिलांना थेट आरक्षण देण्याची आयोगाची सूचना असल्याने २९ पैकी १४ प्रभागांवर थेट आरक्षण देण्यात आले. त्यानंतर पंधरा जागांवर आरक्षण टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. एकूण प्रभागांवर किमान दोन जागा अराखीव असतील, तर त्या ठिकाणी सर्वसाधारण महिलांना संधी द्यावी, अशी सूचना आयोगाची होती. त्यानुसार १२ प्रभागांवर थेट आरक्षण देण्यात आले, तर तीन जागा सोडतीद्वारे निश्चित करण्यात आल्या.

२८ प्रभाग सर्वसाधारण

अनुसूचित जाती, अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण महिला यांचे आरक्षण पूर्ण झाल्यानंतर ते २८ प्रभाग शिल्लक राहिले ते सर्व सर्वसाधारण म्हणजेच खुले झाले असल्याचे जाहीर करण्यात आले.

आरक्षण सोडतीचे चित्रीकरणमहानगरपालिका निवडणूक आरक्षण सोडतीचे संपूर्ण चित्रीकरण करण्यात आले. पूर्ण प्रक्रिया पारदर्शक ठेवण्याचा प्रशासनाने प्रयत्न केला. सोडतीचे स्थानिक वाहिन्या तसेच फेसबुकद्वारेही प्रक्षेपण करण्यात आले. त्यामुळे अनेकांना या सोडतीचा कार्यक्रम घरबसल्या पाहता आला.

सोडतीवेळी प्रशासक बलकवडे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत आडसुळे, सहायक आयुक्त विनायक औधकर, संदीप घार्गे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, मुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, निवडणूक अधिकारी सुधाकर चल्लावाड यांच्यासह आर. के. पोवार, अजित ठाणेकर, चंद्रकांत घाटगे, विजय खाडे, अनिल कदम, मोहन सालपे, किशोर घाडगे उपस्थित होते

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकreservationआरक्षण