शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: सहायक आयुक्त आकोडेंसह उपशहर अभियंत्यावर कारवाई, २९ कर्मचाऱ्यांचा पगार कपात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 12:36 IST

प्रशासकांची कारवाई

कोल्हापूर : महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी सोमवारी दुपारी एक वाजता गांधी मैदान विभागीय कार्यालयाची अचानक तपासणी केली. यावेळी विभागीय कार्यालयात प्रभाग क्षेत्रीय अधिकारी तथा सहायक आयुक्त नेहा आकोडे, उपशहर अभियंता महादेव फुलारी यांच्यासह २९ कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे प्रशासक मंजूलक्ष्मी यांनी या सर्वांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याची कारवाई केली.शहरातील नागरिकांना महापालिकेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या अत्यावश्यक सुविधा उदा. पाणी पुरवठा, मलनि:सारण, स्वच्छता, पथदिवे, रस्ते, सांडपाणी इत्यादी बाबत वेळोवेळी येणाऱ्या तक्रारी त्वरित सोडविण्यासाठी प्रभाग क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु प्रभाग क्षेत्रीय अधिकारी विभागीय कार्यालयामध्ये उपलब्ध होत नसल्याने मुख्य कार्यालयामध्ये नागरिकांना तक्रारी निराकरणासाठी यावे लागते.या तक्रारी विभागीय कार्यालयस्तरावर सोडविण्यासाठी विभागीय कार्यालय क्र.१ ते ४ मधील सर्व प्रभाग क्षेत्रीय अधिकारी, उपशहर अभियंता व संबंधित कर्मचाऱ्यांनी दर आठवड्यातील सोमवारी व मंगळवारी सकाळचे सत्रामध्ये विभागीय कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. यावेळी नागरिकांच्या येणाऱ्या तक्रारी समक्ष विभागीय कार्यालय स्तरावरच निर्गत करण्याच्या सूचना प्रशासकांनी दिल्या आहेत.सोमवारी गांधी मैदान विभागीय कार्यालयाची प्रशासक मंजूलक्ष्मी यांनी अचानक तपासणी केली असता प्रभाग क्षेत्रीय अधिकारी तथा सहायक आयुक्त नेहा आकोडे, उपशहर अभियंता महादेव फुलारी व या कार्यालयातील २९ कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

अधिकारीच भेटत नाहीतविभागीय कार्यालयातील अधिकारी, अभियंता तसेच अन्य कर्मचारी नागरिकांना भेटत नाहीत. कधीही कार्यालयात चौकशी केली तरी एक तर भागात फिरती किंवा मुख्य कार्यालयात गेले असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे नागरिक वैतागून गेलेले असतात. तक्रार करायची तर कोणाकडे असा त्यांना प्रश्न पडतो. अधिकारी, कर्मचारी भेटत नसल्याने नाईलाजास्तव अनेक नागरिक थेट प्रशासकांना भेटायला जातात.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcommissionerआयुक्त