शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा १५ दिवसांत सुरू, उद्या मुंबईत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 2:43 PM

कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा येत्या १५ दिवसांत सुरू करण्याबाबत हालचाली गतिमान झाल्या असून, या मार्गावर विमानसेवेचा स्लॉट मिळाला आहे; पण तो सकाळी व दररोजचा मिळावा, विमानतळ विस्तारीकरणाबाबत आवश्यक तितकीच जागा ताब्यात घेण्यात यावी, याबाबत उद्या, मंगळवारी मुंबईत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे.

ठळक मुद्दे कोल्हापूर-मुंबई विमानसेवा १५ दिवसांत सुरू, उद्या मुंबईत बैठकरोज सकाळी स्लॉटचे वेळापत्रक निश्चित करण्यासाठी आग्रह

कोल्हापूर : कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा येत्या १५ दिवसांत सुरू करण्याबाबत हालचाली गतिमान झाल्या असून, या मार्गावर विमानसेवेचा स्लॉट मिळाला आहे; पण तो सकाळी व दररोजचा मिळावा, विमानतळ विस्तारीकरणाबाबत आवश्यक तितकीच जागा ताब्यात घेण्यात यावी, याबाबत उद्या, मंगळवारी मुंबईत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे.कोल्हापूर-मुंबई या विमानसेवेला कोल्हापुरातून उद्योजकांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेंतर्गत कोल्हापूर-मुंबई मार्गावर गेल्यावर्षी सुरू झालेली विमानसेवा अवघ्या तीन महिन्यांतच बंद पडली; पण आता वाढत्या मागणीनुसार ‘टू जेट’ आणि ‘स्टार एअर’ यांना मान्यता देण्यात आली आहे.

कोल्हापूर-मुंबई या मार्गासाठी एअर डेक्कनसाठी असणारा दुपारच्याच सत्रातील आठवड्यातून तीनवेळा वेळेचा स्लॉट देण्यात आला आहे; पण यासाठी सकाळच्या सत्रातील स्लॉट असावा, अशी उद्योजकांतून मागणी आहे.

याशिवाय ‘उडान’च्या करारामध्ये दररोज स्लॉट देण्याचा करार करण्यात आलेला आहे; त्यामुळे ही सेवा रोज सुरू व्हावी, अशा मागणीसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे आग्रही आहेत, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळच्या सत्रात स्लॉट देण्याबाबत प्रयत्न करण्याची यापूर्वी ग्वाही दिली आहे.याशिवाय कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी अतिरिक्त ६४ एकर जागेबाबत विषय प्रलंबित आहे; पण त्यापैकी आवश्यक असलेल्या जागेबाबतही या बैठकीत निर्णय होणार आहे; त्यामुळे येत्या १५ दिवसांत कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे.या बैठकीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जीव्हीएस एअरपोर्ट अ‍ॅथोरेटी, महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कार्पोरेशन (एमएमएडीसी), मुख्य सचिव, विमानतळ संचालक कमलकुमार कटारिया, आमदार अमल महाडिक हे उपस्थित राहणार आहेत.

  • दररोज सकाळी स्लॉट मिळावा
  •  नाईट लँडिंगची सुविधा
  •  विमानतळ विस्तारीकरणासाठी अतिरिक्तजागांपैकी आवश्यक तेवढीच जागा घेण्याबाबत आग्रह

 

 

टॅग्स :Airportविमानतळkolhapurकोल्हापूर