शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस ५ नोव्हेंबरपासून धावणार, पण..

By पोपट केशव पवार | Updated: October 27, 2023 18:09 IST

कोल्हापूर : कोराना काळापासून बंद असलेली कोल्हापूर -मुंबई सह्याद्री एक्सप्रेस दोन वर्षानंतर धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबईतील सीएसटी ...

कोल्हापूर : कोराना काळापासून बंद असलेली कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्सप्रेस दोन वर्षानंतर धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबईतील सीएसटी स्थानकावर प्लॅटफॉमचे काम सुरु असल्याने ही रेल्वे ५ नोव्हेंबरपासून रोज कोल्हापुरातून पुण्यापर्यंत सोडली जाणार आहे. कोल्हापूर-पुणे या मार्गावर ३१ डिसेंबरपर्यत ही रेल्वे धावेल. पुणे-कोल्हापूर ही रेल्वे ६ नोव्हेंबर ते १ जानेवारी २०२४ पर्यंत धावणार आहे. निदान पुण्यापर्यंत तरी ही रेल्वे सुरु झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोल्हापुरातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यातच कोरोना काळापासून सह्याद्री एक्सप्रेस बंद करण्यात आल्याने महालक्ष्मी एक्सप्रेसला तिकिट मिळणे मुश्किल बनले होते. त्यामुळे सह्याद्री सुरु करण्यासाठी विविध संघटनांनी दबाव निर्माण केला होता. मध्य रेल्वेच्या बैठकीत खासदार धैर्यशील माने यांनीही सह्याद्री सुरु करण्याची आग्रही मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर सह्याद्री एक्सप्रेस पुण्यापर्यंत सुरु करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून शुक्रवारी घेण्यात आला.रोज रात्री ११ : ३० वाजता ही रेल्वे कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्थानकावरून सुटेल. ती सकाळी ७ : ४५ वाजता पुण्यात पोहचेल. तर पुण्यातून रोज रात्री ९: ४५ वाजता सुटणारी रेल्वे कोल्हापुरात पहाटे ५ : ४० वाजता पोहचणार आहे.

प्लॅटफॉमचे काम संपले की सह्याद्री मुंबईपर्यंतसीएसटी स्थानकावर प्लॅटफॉमचे काम सुरु असल्याने ही रेल्वे तात्पुरती पुण्यापर्यंतच सोडली जात आहे. प्लॅटफॉमचे काम संपल्यानंतर सह्याद्री एक्सप्रेस मुंबईपर्यत पूर्ववत सुरु केली जाणार असल्याचे समजते.

कोरोनाकाळापासून बंद असलेली सह्याद्री एक्सप्रेस निदान पुण्यापर्यंत सुरु झाल्याने प्रवाशांचा त्रास वाचला आहे. ही रेल्वे मुंबईपर्यत लवकरच सुरु व्हावी यासाठी पाठपुरावा करणार आहे. शिवनाथ बियाणी, सदस्य, मध्य रेल्वे प्रवाशी सल्लागार समिती, पुणे विभाग.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरrailwayरेल्वे