कोल्हापूर, मुंबई, नागपूर उपांत्यपूर्व फेरीत
By Admin | Updated: December 29, 2014 00:21 IST2014-12-29T00:19:04+5:302014-12-29T00:21:05+5:30
राज्यस्तरीय हॅण्डबॉल स्पर्धा

कोल्हापूर, मुंबई, नागपूर उपांत्यपूर्व फेरीत
सांगरूळ : सांगरुळ हायस्कूलच्या मैदानावर सुरू असलेल्या राज्यस्तरीय ग्रामीण हॅण्डबॉल स्पर्धेत कोल्हापूरसह मुंबई, नागपूर, अमरावती, जळगाव, सोलापूर, सांगली या संघांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. या स्पर्धेचे उद्घाटन आज, रविवारी आंतरराष्ट्रीय नेमबाज राधिका बराले यांच्या हस्ते व सांगरुळ शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. जयंत आसगांवकर, राहुल रोकडे, सचिन देसाई आदींच्या उपस्थित झाला.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी कोल्हापूरच्या संघाने उत्कृष्ट खेळाची चमक दाखवत स्पर्धेवर आपले वर्चस्व कायम राखले. त्याचबरोबर मुंबई, नागपूर, सोलापूर, जळगाव, अमरावतीच्या संघानेही चांगला खेळ करत स्पर्धेत आपला दबदबा कायम राखला. स्पर्धेत पंच म्हणून इम्तियाज शेख, राहुल रोकडे, अमित पाटील, सचिन देसाई, उदय पाटील, अमित भोसले, अभिजित नाळे, सतीश घोंगडे, राज खाडे यांनी काम पाहिले. (वार्ताहर)