शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा बंद, कंपनीला ‘ब्लॅकलिस्ट’ करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 17:51 IST

‘उडान ’योजनेच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत सुरू झालेली कोल्हापूर-मुंबई विमानसेवा बंद झाली आहे. ही सेवा नियमितपणे देण्यास अपयशी ठरलेल्या एअर डेक्कन कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. ‘उडान ’च्या दुसऱ्या टप्प्यामधील हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर विमानसेवा अलायंस एअर कंपनीच्या माध्यमातून दि. १ नोव्हेंबरपासून सुरू होईल. त्यासाठीची चाचणी सहा दिवसांत होईल, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

ठळक मुद्देकोल्हापूर-मुंबई विमानसेवा बंद, कंपनीला ‘ब्लॅकलिस्ट’ करण्याची मागणीएक नोव्हेंबरपासून कोल्हापूर-हैदराबाद सेवा

कोल्हापूर : ‘उडान ’योजनेच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत सुरू झालेली कोल्हापूर-मुंबई विमानसेवा बंद झाली आहे. ही सेवा नियमितपणे देण्यास अपयशी ठरलेल्या एअर डेक्कन कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. ‘उडान ’च्या दुसऱ्या टप्प्यामधील हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर विमानसेवा अलायंस एअर कंपनीच्या माध्यमातून दि. १ नोव्हेंबरपासून सुरू होईल. त्यासाठीची चाचणी सहा दिवसांत होईल, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.गेल्या सहा महिन्यांपूर्वी एअर डेक्कनच्या माध्यमातून कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू झाली. आठवड्यातून तीन दिवस विमानसेवा पुरविण्यात येत होती. या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद राहिला; मात्र, कंपनीकडून सुरुवातीच्या दीड महिन्यानंतर सेवा देण्यात खंड पडला.

त्यावर या कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली असता, पुन्हा या कंपनीकडून सेवा सुरू झाली; मात्र, गेल्या वीस दिवसांपासून कोल्हापूर-मुंबई विमानसेवा बंद आहे. या एअर डेक्कन कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी पुन्हा केंद्र सरकारकडे करणार आहे. अलायंस एअर कंपनीच्या माध्यमातून हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर अशी विमानसेवा सुरू होणार असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.

कोल्हापूर-तिरूपतीसेवा डिसेंबरमध्ये‘उडान’च्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत अलायन्स एअरच्या माध्यमातून कोल्हापूर-मुंबई सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासह कोल्हापूर-तिरूपती विमानसेवा साधारणत: १५ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ही सेवा इंडिगो कंपनी पुरविणार असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले. 

 

टॅग्स :airplaneविमानkolhapurकोल्हापूरDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिक