शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : शाहू अभ्यास केंद्रास निधी न दिल्यास आंदोलन : रविकिरण इंगवलेंचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 12:40 IST

कोल्हापूर महानगरपालिकेच्या भास्करराव जाधव वाचनालयाकडील राजर्षी शाहू अभ्यास केंद्रासाठी जिल्हा नियोजन मंडळातून आर्थिक मदत करू, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी देऊनही गेल्या काही महिन्यांपासून मदत देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. निधी देण्यासंदर्भातील निर्णय लवकरात लवकर न झाल्यास प्रसंगी रस्त्यावर येऊन आंदोलन करावे लागेल, असा इशारा माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला.

ठळक मुद्दे राजर्षी शाहू अभ्यास केंद्र सुरू करण्याचा महानगरपालिका सभेत निर्णय अभ्यास केंद्रासाठी १ कोटी ७५ लाख रुपये खर्च अपेक्षित निधी मिळू शकतो म्हणून प्रस्ताव जिल्हा नियोजन मंडळाकडे ‘देतो-करतो’ एवढेच पालकमंत्री म्हणतात, करत मात्र काहीच नाहीत

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या भास्करराव जाधव वाचनालयाकडील राजर्षी शाहू अभ्यास केंद्रासाठी जिल्हा नियोजन मंडळातून आर्थिक मदत करू, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी देऊनही गेल्या काही महिन्यांपासून मदत देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. निधी देण्यासंदर्भातील निर्णय लवकरात लवकर न झाल्यास प्रसंगी रस्त्यावर येऊन आंदोलन करावे लागेल, असा इशारा माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांनी  पत्रकार परिषदेत दिला.कोल्हापुरात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या  विद्यार्थ्यांना वाचन, अध्ययन करण्याकरिता सर्व साहित्याची उपलब्धता करून देण्याच्या हेतूने महानगरपालिका सर्वसाधारण सभेत राजर्षी शाहू अभ्यास केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. शारंगधर देशमुख व सुनील पाटील यांनी दिलेला प्रस्ताव महासभेने मंजूर केला.

अभ्यास केंद्रात कोणती कामे करायला लागणार आहेत, त्याचा खर्च किती येईल याचा आराखडाही महानगरपालिकेने करून घेतला. अभ्यास केंद्रासाठी १ कोटी ७५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. नाविन्यपूर्ण योजनेतून असा निधी मिळू शकतो म्हणून हा प्रस्ताव जिल्हा नियोजन मंडळाकडे पाठविण्यात आला.हे अभ्यास केंद्र आपल्या प्रभागात येत असल्याने मी स्वत: दोनवेळा पालकमंत्री पाटील यांना भेटून त्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांनाही ही कल्पना आवडली होती. त्यांनी निधी देण्याचे मान्य केले; परंतु त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. ‘देतो-करतो’ एवढेच पालकमंत्री म्हणतात, करत मात्र काहीच नाहीत. त्यांच्या मनात काय आहे कळत नाही. त्याच्यामध्ये काही राजकारण आले आहे का याची आपणाला शंका येत असल्याचे इंगवले म्हणाले.अभ्यास केंद्राचा लाभ हा बहुजन समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना होणार आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अन्यथा आपणाला त्याकरिता रस्त्यावर येऊन आंदोलन करावे लागले तरी मागे-पुढे पाहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी नगरसेविका तेजस्विनी इंगवले उपस्थित होत्या.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूरcollectorतहसीलदार