शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : जिल्हा परिषदेत ‘महिला-बालकल्याण’ सभापती बदलाच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 15:35 IST

कोल्हापूर जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेतील ठरलेल्या सव्वा वर्षांच्या तडजोडीनुसार महिला व बालकल्याण समिती सभापतींच्या राजीनाम्याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांची बैठक झाली.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हा परिषदेत ‘महिला-बालकल्याण’ सभापती बदलाच्या हालचाली‘स्वाभिमानी’च्या नेत्यांची झाली बैठक; राजीनामा शक्य

कोल्हापूर : जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेतील ठरलेल्या सव्वा वर्षांच्या तडजोडीनुसार महिला व बालकल्याण समिती सभापतींच्या राजीनाम्याबाबत  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत ठोस निर्णय झाला नसला तरीही सभापती शुभांगी शिंदे यांच्या राजीनाम्यावर आज, मंगळवारी शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच या पदावर आवाडे गटाच्या वंदना मगदूम यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.दोन महिन्यांपासून जिल्हा परिषदेतील अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच चार विषय समित्यांच्या पदांच्या बदलाबाबत चर्चा सुरू आहे; पण गटनेत्यांमध्येएकमत होत नसल्याने सव्वा वर्षाचा पदाधिकारी बदलाचा ‘फॉर्म्युला’ लांबणीवर पडला.

यापूर्वी भाजपकडे असणारे अध्यक्षपद बदलले जाणार नसल्याचे यापूर्वीच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले, पण इतर पदाधिकारी बदलासाठी भाजपचा पूर्णपणे पाठिंंबा राहील, असेही जाहीर केले आहे. त्यामुळे सत्तेतील इतर घटक पक्षांच्या नेत्यांकडूनही पदाधिकारी बदलासाठी चालढकल केली जात आहे.पण स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आवाडे गटाच्या ठरलेल्या सव्वा वर्षांच्या तडजोडीनुसार महिला व बालकल्याण समिती सभापती बदलाच्या हालचाली वेगवान झाल्या आहेत.

त्याबाबत सोमवारी सायंकाळी जिल्हा परिषदेमध्ये महिला व बालकल्याण समिती सभापती शुभांगी शिंदे, ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांच्यासह ‘स्वाभिमानी’च्या इतर प्रमुख नेत्यांची बैठक झाली; पण त्या बैठकीत कोणताच निर्णय झाला नाही, पण निर्णय आज, मंगळवारी होण्याची शक्यता असून त्यानंतरच सभापती शिंदे आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.अध्यक्षसह इतर पदे अडीच वर्षेभाजपकडे असणारे जिल्हा परिषद अध्यक्षपदासह शिवसेनेकडील उपाध्यक्ष व शिक्षण-अर्थ सभापतिपद तसेच ‘जनसुराज्य’कडील बांधकाम व समाजकल्याण समिती सभापती ही पदे अडीच वर्षे कायम राहण्याची शक्यता आहे. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर