शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :‘प्राधिकरणा’स ठोकले टाळे, शिवसेनेचे आंदोलन; अधिकाऱ्यांना काढले बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 16:40 IST

शिवसेनेच्यावतीने मंगळवारी दुपारी मध्यवर्ती प्रशासकिय इमारतीतील कोल्हापूर नागरी विकास क्षेत्र प्राधिकरणाच्या कार्यालयास टाळे ठोकले. शिवसेना मोगलाई खपवून घेणार नाही, टाळे काढल्यास याद राखा असाही दम दिल्याने अधिकारी व कर्मचारी हतबल झाले.

ठळक मुद्दे‘प्राधिकरणा’स ठोकले टाळे, शिवसेनेचे आंदोलन; अधिकाऱ्यांना काढले बाहेरठोस धोरण-भूमीका नसल्याने आंदोलन

कोल्हापूर : ठोस धोरण नाही, कसे करावे मार्ग नाही तर भूमीकाही स्पष्ट नसल्याने ग्रामीण जनतेची प्राधिकरणाबाबतची संभ्रमावस्था व भिती निर्माण झाली आहे, प्रथम ही भीती दूर करा मगच कार्यालय सुरु ठेवा असा इशारा देत शिवसेनेच्यावतीने मंगळवारी दुपारी मध्यवर्ती प्रशासकिय इमारतीतील कोल्हापूर नागरी विकास क्षेत्र प्राधिकरणाच्या कार्यालयास टाळे ठोकले. शिवसेना मोगलाई खपवून घेणार नाही, टाळे काढल्यास याद राखा असाही दम दिल्याने अधिकारी व कर्मचारी हतबल झाले.प्राधिकरण स्थापनेपासूनच या प्राधिकरणाचा ठोस आराखडा तयार नसल्याने प्राधिकरणात समाविष्ठ असलेल्या ४२ गावातील जनतेत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे त्यामुळे शिवसेनेने आंदोलनाचे पाऊल उचलले.शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार आणि विजय देवणे, शहराध्यक्ष दुर्गेश लिंग्रस आणि शिवाजी यादव यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दुपारी शिवसैनिक गळ्यात भगवे उपरणे आडकवून प्राधिकरण कार्यालयात आले. त्यांनी थेट प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.

प्राधिकरणाबाबत ग्रामीण जनतेला माहिती आहे का? गावांच्या बैठका घेतल्या का? असे प्रश्न विचारले. ज्यावेळी ही माहिती ग्रामीण जनतेला होईल त्याचवेळी कार्यालय सुरु करा असा सल्ला देत संजय पवार व विजय देवणे यांनी, अधिकारी शिवराज पाटील व त्यांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना बाहेर काढले.

जोपर्यत गावांच्या बैठका घेऊन प्राधिकरण म्हणजे काय? याची माहिती दिली जात नाही, ग्रामीण जनतेच्या मनातील प्राधिकरणाची भिती जात नाही तोपर्यत कार्यालय सुरु करु नका असा इशारा देत शिवसैनिकांनी प्राधिकरणाच्या कार्यालयास टाळे ठोकले.या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, तालुका प्रमुख राजू यादव, तानाजी आंग्रे, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख दिनेश परमार, विराज पाटील, शशि बिडकर, सुनिल पोवार, सरदार तिप्पे, अनिल पाटील, विराज ओतारी, राजू जाधव, रणजीत आयरेकर, शुभांगी पोवार, रिया पाटील, दिपाली शिंदे आदींचा सहभाग होता.टाळे काढल्यास याद राखाप्राधिकरणा’च्या अधिकाऱ्यांना कार्यालयातून बाहेर काढल्यानंतर पवार आणि देवणे यांनी कार्यालयाला टाळे ठोकले. यावेळी अधिकारी शिवराज पाटील यांना बोलवून टाळे काढल्यास याद राखा असा दमच दिला.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovernmentसरकारShiv Senaशिवसेना