शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : पंधरा दिवसांत धान्य मार्केट हलवा, पोलिसांच्या व्यापाऱ्यांना सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 11:40 IST

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे लक्ष्मीपुरी धान्य मार्केट येत्या १५ दिवसांत विक्रमनगर येथे स्थलांतरित करण्याच्या सूचना पोलिसांनी व्यापाऱ्यांना दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल गुजर व राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक औदुंबर पाटील यांच्यासह बाजार समिती पदाधिकारी, व्यापाऱ्यांनी विक्रमनगर येथील बाजार आवाराची पाहणी केली.

ठळक मुद्देपंधरा दिवसांत धान्य मार्केट हलवा, पोलिसांच्या व्यापाऱ्यांना सूचना विक्रमनगर बाजाराची केली पाहणी

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे लक्ष्मीपुरी धान्य मार्केट येत्या १५ दिवसांत विक्रमनगर येथे स्थलांतरित करण्याच्या सूचना पोलिसांनी व्यापाऱ्यांना दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल गुजर व राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक औदुंबर पाटील यांच्यासह बाजार समिती पदाधिकारी, व्यापाऱ्यांनी विक्रमनगर येथील बाजार आवाराची पाहणी केली.लक्ष्मीपुरी येथील धान्य मार्केटमुळे शहरातील वाहतुकीची अनेकवेळा कोंडी होते; त्यामुळे हा बाजार हलवावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांची आहे. त्यानुसार बाजार समिती प्रशासनाने विक्रमनगर येथे धान्य मार्केट स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला; पण सुरक्षेच्या कारणामुळे व्यापारी तिथे गेले जात नसल्याने पेच निर्माण झाला होता.समितीने गेल्या सहा महिन्यांत तिथे सुरक्षा व इतर सुविधा पुरवल्या आहेत. त्यातच १९ नोव्हेंबरपासून कोल्हापूर शहरातील अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी अनिल गुजर, औदुंबर पाटील यांच्यासह बाजार समितीचे सभापती कृष्णात पाटील, संचालक नंदकुमार वळंजू, सदानंद कोरगावकर, बाबूराव खोत व सचिव मोहन सालपे, धान्य व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष किशोर तांदळे, नयन प्रसादे, राजेंद्र हळदे, आदींनी विक्रमनगर बाजाराची पाहणी करून सुविधांचा आढावा घेतला.त्यानंतर व्यापारी, समिती प्रशासन व पोलीस अधिकारी यांची बैठक झाली. यामध्ये विक्रमनगर बाजारातील अपूर्ण सुविधा तातडीने पूर्ण करून येत्या १५ दिवसांत लक्ष्मीपुरीतील बाजार हलवावा. यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देणार नसल्याचे पोलिसांनी समिती व व्यापाऱ्यांना सांगितले.

 

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डkolhapurकोल्हापूर